थायरॉईडचा होतोय त्रास? ‘या’ गोष्टी करुन आरामात नियंत्रणात येईल ठेवता
बदलती जीवनशैली आणि प्रचंड तणावामुळे आजच्या काळात अनेक महिलांमध्ये थायरॉईडची समस्या डोकं वर काढत आहे. पण काही चांगल्या सवयी लावल्यामुळे तुम्ही यावर नियंत्रण मिळवू शकता आणि आनंदी आयुष्य जगू शकता...

आजच्या काळात पाहायला गेलं तर, 100 पैकी 95 महिलांना थायरॉईड, PCOD आणि PCOS यांसारख्या समस्या असतात. ज्यामुळे महिलांच्या रोजच्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. आता तर 8 – 10 वर्षां पुढील मुलींंमध्ये थायरॉईडची लक्षणं दिसून येतात. याचं कारण आहे जीवनशैली… बदलती जीवनशैली आणि प्रचंड तणावामुळे, अलीकडच्या काळात थायरॉईडच्या समस्या एक जीवघेणा आजार बनला आहेत. मानेमध्ये असलेली ही लहान ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तिचे नियंत्रण सुटले, तर वजन वाढणे, केस गळणे आणि तीव्र थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पण, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, योग्य आहाराचे नियम पाळल्यास या समस्येवर प्रभावीपणे मात करता येते. तर थायरॉईडचा सामना करत असलेल्या महिलांनी काय करावं आणि काय करु नये जाणून घ्या…
थायरॉईड असलेल्या लोकांनी काय टाळालं पाहिजे….
थायरॉईड हार्मोन्सचे असंतुलन असताना काही विशिष्ट प्रकारचे अन्नपदार्थ समस्या अधिक गंभीर करू शकतात.
सोया प्रॉडक्ट्स: सोयाबीन आणि सोया दुधामुळे थायरॉईडच्या औषधांच्या परिणामात अडथळा येऊ शकतो.
कच्च्या भाज्या: कोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी कच्च्या खाऊ नयेत. त्यांना शिजवल्याने त्यांमधील गॉयट्रोजेनचा प्रभाव कमी होतो.
जंक फूड – साखर: प्रक्रिया केलेले पदार्थ, त्यातील साखरेचे आणि मिठाचे उच्च प्रमाण शरीरातील दाह वाढवते.
कॅफीन – अल्कोहोल: कॉफी, चहा आणि अल्कोहोल हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी सुपरफूड्स
थायरॉईड ग्रंथीच्या सक्रिय कार्यासाठी ही पोषक तत्वे आवश्यक आहेत.
आयोडीन: दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि आयोडीनयुक्त मीठ यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
सेलेनियम – झिंक: बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि संपूर्ण धान्ये हार्मोनच्या निर्मितीस मदत करतात.
प्रथिने: अंडी, पनीर आणि चणे यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ चयापचय सुधारतात.
हिरव्या भाज्या: ताजी फळे आणि हिरव्या भाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे पुरवतात.
जीवनशैलीत हे 5 बदल करा
फक्त अन्नच नाही, तर सवयीही बदलण्याची गरज आहे.
व्यायाम: थायरॉईडच्या आरोग्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा योगा करणे चांगले असते.
तणाव व्यवस्थापन: ध्यानाच्या माध्यमातून तणाव कमी केल्याने हार्मोन्स नियंत्रणात राहतात.
झोप: हार्मोन्सचे संतुलन पूर्ववत करण्यासाठी दिवसातून 7 – 8 तास गाढ झोप आवश्यक असते.
नियमित तपासण्या: दर 3 किंवा 6 महिन्यांनी थायरॉईड प्रोफाइल तपासणी केली पाहिजे.