नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं… सासु-सासऱ्यांचं भयंकर कृत्य
नाशिक येथे आणखी एक हादरवणारी घटना घडली. या प्रकरणातीत सासु सासऱ्यांच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसाला. प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेसोबत नाशिकमध्ये अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक येथे आणखी एक हादरवणारी घटना घडली. या प्रकरणातीत सासु सासऱ्यांच्या कृत्यानं सगळ्यांनाच धक्का बसाला. प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेसोबत नाशिकमध्ये अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे.
तू आमच्या जातीची नाहीस, असे म्हणत सुनेचा सासरच्या मंडळींनी छळ तर केलाच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे या विवाहितेचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. नंतर तिच्या सासूने “तू आमच्या जातीची नाहीस, तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर सासूकडून विवाहितेवर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आला. यानंतर सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या अमानुष छळादरम्यान सासरच्यांनी विवाहितेची इच्छा नसतानाही तिचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणला, असे तक्रारीत म्हटले आहे.
Published on: May 21, 2026 01:50 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

