महिलांनो या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, कोणती आहेत लक्षण? जाणून घ्या

वाढत्या वयोमानानुसार शरीरात बदल होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कधी कधी लघवीला येण्याचं प्रमाण वाढतं. तसेच तहान देखील लागते. अशा स्थितीत यूरिन इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. तसेच इतरही कारणं असू शकतात. चला जाणून घेऊयात आजारांची कोणती कारणं असतील ते..

महिलांनो या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, कोणती आहेत लक्षण? जाणून घ्या
doctor
Image Credit source: tv9 hindi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2025 | 1:36 PM

मानवी शरीराला एकदा का व्याधी जडली तर ती सुटणं खूप कठीण होतं. अशा स्थितीत आयुष्यभर त्या व्याधीसह जगावं लागतं. त्यामुळे योग्यवेळीच आजारावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. शरीरातील काही बदल आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. वारंवार लघवीला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसं असेल तर थायरॉइडचं लक्षण असू शकतं. याबाबत डॉक्टरांचं काय म्हणणं आहे आणि असं का होतं ते समजून घेणं आवश्यक आहे. मॅक्स हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित कुमार यांनी सांगितलं की, जर तुम्हाला दिवसभर वारंवार लघवीला येत असेल आणि तितकीच तहानही लागत असेल तर हे मधुमेहाचे संकेत आहे. मधुमेह असल्यास शरीरातील ग्लूकोज व्यवस्थितरित्या प्रोसेस होत नाही. यामुळे किडनी अधिक प्रमाणात मूत्र तयार करते.

युटीआय

डॉ. रोहित कुमार यांच्या मते, वारंवार लघवीला येणं हे महिलांमध्ये सामान्य बाब आहे. वारंवार लघवीला येणं आणि मूत्रविसर्जन करताना जळजळ किंवा दुखापत होणं, तसेच लघवीला वास येणे हे युटीआयचे लक्षण असू शकतं. याचा योग्य वेळी उपचार केला नाही किडनीवर परिणाम होऊ शकतो.

प्रोस्टेस्ट निगडीत समस्या

प्रोस्टेट ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेतील एक लहान ग्रंथि आहे. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाभोवती असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे वीर्य द्रवात एक विशेष घटक तयार करते. तसेच शुक्राणूंना पोषण देते आणि त्यांची हालचाल सुलभ करतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्गावर दबाव येतो आणि वारंवार लघवी होते. विशेषतः रात्री लघवीचं प्रमाण अधिक असते.

ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर

असा स्थितीत वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. थोडं जरी वाटलं तरी तात्काळ टॉयलेटमध्ये जाणं भाग पडतं. लघवी रोखणं कठीण होतं. हे एक न्यूरोलॉजिकल कारणही असू शकतं.

औषधांची अधिक मात्रा किंवा वारंवार पाणी पिणं

काही औषधांच्या सेवनामुळे वारंवार लघवीला येऊ शकतं. तसेच उन्हाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे वारंवार लघवीला होऊ शकतं.

(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)