
Dengue Recovery Tips : पावसाळ्यात डासांच्या पासून उपद्रव वाढत असल्याने मलेरिया, डेंग्यू किंवा डेंगी ( चिकनगुनिया ) आणि इतर डासांपासूनच्या आजारांचे प्रमाण वाढत असते. या डेंग्यूच्या तापाला चिकनगुनिया देखील म्हटले जाते. यात शरीर तापाने अक्षरश: वाकत असते. त्यामुळे या आजाराला हाडमोड्या ताप देखील म्हटले जाते इतके आपले सांधे आणि डोके दुखत असते. डासाच्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांच्या माध्यमातून विषाणूजन्य ताप येत असतो. या आजारावर ॲलोपथीच बेस्ट असते. परंतू आपण आजारातून बरे होताना ॲलोपथीची औषधे सुरु ठेवून आपला आहार विहार बदलल्यास कमजोरीतून लवकर बाहेर पडतो.
डेंग्यू तापाने आलेल्या कमजोरीनंतर काय खावे
डेंग्यूच्या ताप उतरल्यानंतर शरीराची इम्यूनिटी पॉवर वाढविण्यासाठी किवी, ड्रॅगन फूड किंवा संत्र्यासारखी लिंबूवर्गीय आंबड फळे खावीत.यात विटामिन सी, एंटी-ऑक्सीडेंट आणि मिनरल्स भरपूर असतात. त्यामुळे शरीर अगदम तंदुरुस्त होऊन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.
डेंग्यूतून जर लवकर बरे व्हायचे असेल आणि तुम्हाला दूध पचत असेल तर रोज गरम दूध प्यायल्याने देखील फायदा होतो. दूधात अनेक पोषक तत्वं असतात. ज्यामुळे शरीर हेल्दी बनते आणि उत्साह वाढतो.
डेंग्यू तापातून रिकव्हर झाल्यानंतर तुम्ही शरीरातील कमजोरी घालविण्यासाठी पातळ अन्नपदार्थांना खाऊ शकता. पाणी आणि् फ्रूट ज्यूस भरपूर प्यावा अर्थात घरच्या घरी ज्यूस गेलेला बरा. डाएटमध्ये ग्लूकोजचे पाणी प्यावे,नारळ पाणी, लिंबू पाणी, सरबत पिणे फायदेशीर असते परंतू स्वच्छता असलेल्या ठिकाणचे सरबत प्यावे त्यात भेसळ नको
आपल्या आहारात मोसमी पालेभाज्यांचा अधिक वापर असावा. भाज्याचे सूप देखील करुन पिल्यास फायदा होईल. जास्त तळलेले तेलकट आणि मसालेदार आणि तिखट काही खाऊ नये. कॅफीन आणि हाय कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ उदा. चहा आणि कॉफी तसेच मद्यपान आणि सिगारेट यापासून चार हात लांब राहावे.
डेंग्यूच काय तर कोणत्याही आजारात जर पटकण आपल्याला कमजोरी घालवायची असेल तर प्रोटीन गरजेचे असते. अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन- बी, पोटॅशियम असते. ज्यामुळे डेंग्यूनंतर शरीर मजबूत होण्यासाठी मदत होते.
( Disclaimer : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी आपण आपल्यावर उपचार करणारे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )