मुलांना खायला द्या हे पदार्थ, हाडं होतील एकदम मजबूत

| Updated on: Jan 06, 2023 | 1:59 PM

मुलांच्या हाडांचा बहुतांश विकास हा लहानपणी आणि किशोरावस्थेत होतो. यासाठी पालकांनी त्यांचे आरोग्य आणि हाडांच्या विकासासाठी चांगली जीवनशैली व उत्तम पौष्टिक आहार दिला पाहिजे.

मुलांना खायला द्या हे पदार्थ, हाडं होतील एकदम मजबूत
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – मुलांच्या विकासासाठी त्यांची हाडं मजबूत (strong bones)असणं खूप महत्वाचं असतं. आणि हाडं मजबूत हवी असतील तर त्यासाठी मुलांना चांगला व पौष्टिक (food) आहार दिला पाहिजे. चांगली जीवनशैली व पोषक तत्वांनी (nutrition) युक्त असलेला आहार हा मुलांचे सर्वांगीण आरोग्य आणि विकासासाठी महत्वपूर्ण असतं.

आपली हाडं व सांधे हे शरीराच्या बेसिक सपोर्ट सिस्टिमचा हिस्सा असतात. आपल्या अवयवांचे संरक्षण करण्यात ते महतवपूर्ण भूमिका निभावतात. सर्वात महत्वाची गोषट म्हणजे हाडं मजबूत होण्याची सुरूवात लहानपणापासूनच होते. प्रत्येक व्यक्तीची हाडं लहानपणी व किशोरावस्थेत वाढतात व मजबूत होतात. या काळात हाडांची घनता वेगाने विकसित होते. वयाच्या 18 ते 25 या वयोगटात आलयानंतर हाडांचे घनत्व वाढत नाही. ज्या आई- वडिलांना आपल्या मुलांचा चांगला शारीरिक व मानसिक विकास हवा असेल त्यांनी मुलांच्या हाडाच्या वाढीकडेही नीट लक्ष दिले पाहिजे.

मुलांना व्हिटॅमिन डी युक्त भोजन द्यावे.

हे सुद्धा वाचा

व्हिटॅमिन डी हे हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि आपल्या शरीराला कॅल्शिअम शोषण्यास मदत करते. आजकाल मुलं आणि प्रौढ व्यक्ती या दोघांमध्येव्हिटॅमिन डीची कमतरता ही सामान्य समस्या आहे, मात्र हे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेकांना भविष्यात आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमी पातळीमुळे हाडांची घनता कमी होऊ लागते आणि हाडांना इजा होते.

व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. म्हणूनच तुमच्या मुलांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस किमान 10 मिनिटे सूर्यप्रकाशात पाठवा. त्यांच्या संपूर्ण शरीराला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. याशिवाय व्हिटॅमिन डीसाठी चीज आणि फॅटी फिशही मुलांना खायला देऊ शकता

मुलांना पुरेसे कॅल्शियम द्या

कॅल्शिअम हाडांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि स्नायू आणि हृदयाचे आरोग्य मजबूत करण्यास मदत करते. दूध, पनीर आणि दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहेत. वाढीच्या टप्प्यात मुलांना कॅल्शिअमयुक्त आहार दिला पाहिजे. दिवसातून किमान 2 ग्लास दूध प्यायले पाहिजे, ते हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते. याशिवाय तुम्ही दिवसातून एकदा तरी मुलांच्या जेवणात एक वाटी दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशिअम

व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात असलेल्या लोकांमध्ये हाडांची घनता चांगली असते आणि त्यांना मुडदूस आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या हाडांच्या आजारांचाही कमी धोका असतो. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशिअम असलेला आहार द्यावा. पालक, केल, कोबी, तृणधान्ये आणि हिरवे स्प्राउट्स यासारख्या हिरव्या भाज्या व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशिअमचे चांगले स्रोत आहेत.

निरोगी जीवनशैली जगण्यास प्रोत्साहन द्यावे

आजच्या डिजिटल युगात वडिलधाऱ्यांसोबत लहान मुलांनाही मोबाईल फोन, कॉम्प्युटर यासारख्या गोष्टींचे व्यसन लागले आहे. आजकाल बहुतेक मुले मोबाईलवर गेम खेळताना घरातच बंदिस्त असतात. बाहेर खेळायला जाणे हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच मुलांना फक्त घरातच ठेवू नका. त्यांना उद्यानात चालायला, जॉगिंग करायला, धावायला आणि खेळायला प्रवृत्त करा. अशा उपक्रमांमुळे मुलांची हाडे मजबूत होतील आणि त्यांचे मन आणि शरीर देखील सक्रिय राहील.