Research| मधुमेह विच्छेदन होण्याचा धोका कमी, वाचा संशोधनातुन नेमके काय पुढे आले!

| Updated on: Jun 16, 2022 | 4:46 PM

UVA च्या आरोग्य विज्ञान विभागातील संशोधक जेनिफर लोबो म्हणाले की, आमच्या संशोधनामध्ये हे समजले की, वार्षिक निरोगी भेटी मुख्य अंतरविच्छेदनाच्या कमी जोखमीशी संबंधित आहेत, जे रूग्णांना प्रतिबंधात्मक काळजी सेवांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मधुमेह असलेल्या लोकांना अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, स्ट्रोक आणि हृदयविकार तसेच पायाची बोटे खराब होणे यासह गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.

Research| मधुमेह विच्छेदन होण्याचा धोका कमी, वाचा संशोधनातुन नेमके काय पुढे आले!
Image Credit source: news-medical.net
Follow us on

युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नुकताच एक संशोधन (Research) केले आहे. संशोधनामध्ये एक महत्वाची माहिती पुढे आलीये. मेडिकेअरद्वारे कव्हर केलेल्या मोफत वार्षिक आरोग्य भेटीमध्ये सहभागी होणार्‍या मधुमेहाचे रुग्ण 36 टक्के कमी असतात. संशोधकांनी 2006 ते 2015 मधील डायबेटिस बेल्ट मधील मेडिकेअर असलेल्या रूग्णांच्या डेटावर हे सर्व संशोधन केले आहे. अमेरिका (America) आणि अॅपलाचियनमधील 644 काउन्टींमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, जगभरामध्ये सातत्याने मधुमेहाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. मधुमेह (Diabetes) झाल्यानंतर पायाच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. तसेच आपल्या पायाला काही दुखापत झाली की, सडण्याची समस्या वाढते आणि परिणामी तो भाग शरीरापासून वेगळा करावा लागतो.

पायाची बोटे खराब होण्याची अधिक शक्यता

UVA च्या आरोग्य विज्ञान विभागातील संशोधक जेनिफर लोबो म्हणाले की, आमच्या संशोधनामध्ये हे समजले की, वार्षिक निरोगी भेटी मुख्य अंतरविच्छेदनाच्या कमी जोखमीशी संबंधित आहेत, जे रूग्णांना प्रतिबंधात्मक काळजी सेवांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मधुमेह असलेल्या लोकांना अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, स्ट्रोक आणि हृदयविकार तसेच पायाची बोटे खराब होणे यासह गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. मधुमेहापासून होणारी गुंतागुंत सामान्यतः नसल्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी हा या गुंतागुंत टाळण्याचा किंवा विलंब करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजेच मधुमेहाच्या रूग्णांनी आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. जर आपल्याला मधुमेह झाला असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची जखम होणार नाही, याची विशेष काळजी घ्यायला हवी.

हे सुद्धा वाचा

पाहा संशोधन नेमके काय म्हणाले

संशोधकांना असे आढळून आले आहे की, पायाच्या गुंतागुंतांचे निदान होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. वार्षिक भेटीमध्ये सहभागी झालेल्या मधुमेहाच्या रूग्णांच्या पायाच्या गुंतागुंतीचे निदान लवकर झाले असावे, ज्यामुळे अंगविच्छेदन म्हणजेच पायाचा काही भाग (सडलेला) काढून टाकण्याची वेळ आली नाही. जर आपण पायांची योग्य काळजी घेतली आणि जर एखादी जखम पायाला झालीच तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घेतला तर गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका कमी होऊ शकतो. लोबो म्हणाले की, वार्षिक निरोगी भेटी आणि प्रतिबंधात्मक काळजी यांच्या मूल्याबद्दल रुग्णांचे शिक्षण देखील फायदेशीर ठरते. रूग्णांनी काळजी घेतली तर नक्कीच पायाची गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.