Summer Eyes Care: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ञांचे मत…

summer eyecare: उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यसह डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे, गॉगल घालणे आणि संतुलित आहार घेणे असा सल्ला तज्ञांनी सल्ला दिला आहे.

Summer Eyes Care: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ञांचे मत...
eye care
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2025 | 12:06 PM

उन्हाळ्याला सुरूवात होताच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना योग्य रित्या हायड्रेटेड नाही राहिल्यामुळे तुम्हाला उष्मघाताच्या आणि आरोग्या संबंधित समस्या होऊ शकतात. तसेच उन्हाळ्याच्या काळात त्वचेशी संबंधित समस्या वाढत असताना, उन्हात बाहेर पडल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. आपले डोळे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला, एम्सच्या डॉक्टरांच्या त्या टिप्सबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा अवलंब करून आपण आपले डोळे निरोगी ठेवू शकतो आणि उन्हाळ्यात संसर्ग टाळू शकतो.

उन्हाळ्यात डोळ्यांच्या अ‍ॅलर्जीची समस्या वाढते आणि डोळे लाल होतात. याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणातील आर्द्रता आणि प्रदूषण, जे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. या कारणामुळे डोळ्यांना लवकर संसर्ग होतो. डोळ्याचा भाग संवेदनशील असल्यामुळे त्याची योग्य रित्या काळजी नाही घेतल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावा लागते. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता.

हात स्वच्छ ठेवा – डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी, आपण आपले हात स्वच्छ ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्याने बॅक्टेरिया डोळ्यांत प्रवेश करतात, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाहेरून परताल तेव्हा प्रथम तुमचे हात धुवा आणि नंतर डोळ्यांना स्पर्श करा. याशिवाय, दुसऱ्याचा रुमाल वापरू नका. नेहमी तुमचा स्वच्छ रुमाल वापरा.

सूर्यकिरणांपासून संरक्षण – सूर्यप्रकाशातून निघणारे अतिनील किरण आपल्या डोळ्यांना नुकसान करतात, म्हणून बाहेर पडताना नेहमी गॉगल घालात जेणेकरून तुमचे डोळे सुरक्षित राहतील.

चांगल्या जीवनशैलीची काळजी घ्या – योग्य जीवनशैली आणि संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. चुकीच्या आहारामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, ज्या डोळ्यांसाठी देखील हानिकारक ठरू शकतात. म्हणून, जंक फूड टाळा आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून तुमचे डोळे देखील निरोगी राहतील.

या गोष्टी लक्षात ठेवा….

दररोज पाण्याने डोळे धुणे कधीकधी आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते.

जर तुम्ही वारंवार पाण्याने डोळे धुतले तर डोळ्यांच्या नसा कोरड्या होऊ शकतात.

त्यामुळे डोळ्यांत घाण असेल तरच पाणी वापरा.