बेफिकीर राहू नका, हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं, डान्स करताना ॲटॅक येऊन होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; असं का होतंय?

| Updated on: Oct 18, 2022 | 12:06 PM

आजारी असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच एक्सरसाईज करावी किंवा डान्स करावा. खाण्यापिण्यावर लक्ष द्यावं. डाएट फॅटच्या तुलनेत कमी असावे.

बेफिकीर राहू नका, हे कुणाच्याही बाबतीत घडू शकतं, डान्स करताना ॲटॅक येऊन होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; असं का होतंय?
डान्स करताना ॲटॅक येऊन होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं; असं का होतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून हृदयविकारामुळे (Heart Attack) मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. विशेष म्हणजे एखाद्या कार्यक्रमात डान्स करत असताना हार्ट ॲटॅक येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) आणि हार्ट ॲटॅकमुळे असं होत आहे. या दोन्ही कारणांमुळे जागेवरच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे या केसेसमध्ये रुग्णांमध्ये कोणतेही लक्षण आढळून येत नाहीत. डान्स केल्यामुळे ॲटॅक का येत आहे? डान्स (dance) आणि हृदयविकारच्या आजाराचा काही संबंध आहे का? याबाबत एक्सपर्टचं काय मत आहे, यावर टाकलेला हा प्रकाश.

टीव्ही9 भारतवर्षने डॉक्टरांशी संवाद साधून या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर चिन्मय गुप्ता यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. डान्स ही एक्सरसाईज सारखी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. यात शरीराला मेहनत करावी लागते.

हे सुद्धा वाचा

डान्सच्यावेळी शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज असते. यावेळी हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे हृदय वेगाने सक्रिय होतं. एखाद्या व्यक्तीला 60 ते 70 टक्के ब्लॉक असेल तर डान्स करताना त्याला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता पडते. शिवाय हार्ट रेट वाढल्याने त्याच्या आर्टरीजवर परिणाम होतो आणि परिणामी त्याला हृदयविकाराचा झटका येतो.

याशिवाय सडन कार्डियाक अरेस्टमुळेही अचानक मृत्यू होत असल्याचं दिसून आलं आहे. यात शरीरातील इलेक्ट्रिकल सिस्टिम खराब होते. अचानक हृदयाचे ठोके बंद होतात. हृदय बंद पडल्याने मेंदू आणि फुफ्फुसाला रक्त मिळत नाही. व्यक्तीचा प्लस रेट कमी होतो. त्यामुळे तो बेहोश पडतो. अशावेळी जागीच मृत्यू ओढवतो.

डॉ. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक कोव्हिडमुळे गंभीर आजारी आहेत. त्यांच्या हार्ट आर्टरीजमध्ये ब्लड क्लॉट होण्याचं प्रमाण दिसून येतं. जर आधीच ब्लॉक असतील आणि कोव्हिडमुळे अधिक झाले असतील तर अशावेळी हृदयाचा रक्तपुरवठा बंद होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अनेक बाबतीत याची काही लक्षणं आधीच दिसून येतात.

मात्र, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येतो. ज्या लोकांना अति तणाव, स्थुलपणा आणि मधूमेह आदी समस्या आहेत, त्यांना हृदयविकाराचे झटके येण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा लोकांनीविशेष करून काळजी घेतली पाहिजे.

डान्स असो किंवा एक्सरसाईज करताना काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना आधीच काही आजार असतील तर त्यांनी अचानक हेवी वर्क आऊट करू नये. डान्सही करू नये. कारण हार्टमध्ये आधीच ब्लॉकेज असतील तर डान्स करताना हार्ट ॲटॅक येऊ शकतो. त्यामुळे सावधानता बाळगली पाहिजे, असं राजीव गांधी हॉस्पिटलचे कार्डियोलॉजी विभागाचे सर्जन डॉ. अजित जैन यांनी सांगितलं.

प्रत्येक व्यक्तीने दर तीन महिन्याने चेस्ट सीटी स्कॅन आणि लिपिड प्रोफाईल टेस्ट केली पाहिजे. त्यामुळे हृदयातील कोलेस्ट्रॉलची माहिती मिळते. तसेच एखाद्या ब्लॉकेजचीही माहिती मिळते. ब्लॉकेज कमी असतील तर डॉक्टर औषधे आणि चांगली डाएटच्या माध्यमातून ते बरे करतात.

तसेच परिस्थिती गंभीर असेल तर सर्जरी करता येते. त्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो, असं जैन यांनी सांगितलं.

आजारी असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच एक्सरसाईज करावी किंवा डान्स करावा. खाण्यापिण्यावर लक्ष द्यावं. डाएट फॅटच्या तुलनेत कमी असावे. प्रोटीन आणि व्हिटामिन घ्या. नियमितपणे योगा करा आणि मानसिक तणाव घेऊ नका, असं डॉक्टर सांगतात.