Eye Brows Care : पातळ आयब्रोज दाट करण्यासाठी करा फक्त ही एक गोष्ट, जाणून घ्या

| Updated on: Jun 02, 2023 | 9:16 PM

काही स्त्रियांचे आयब्रोज हे दाट असतात जे खूप सुंदर दिसतात. पण बहुतेक स्त्रियांचे आयब्रोज हे पातळ असतात. त्यामुळे अशा स्त्रिया हे पातळ आयब्रोज लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मात्र हा घरगुती उपाय एकदा करून पाहाच.

Eye Brows Care : पातळ आयब्रोज दाट करण्यासाठी करा फक्त ही एक गोष्ट, जाणून घ्या
Follow us on

Health : प्रत्येक स्त्रिला वाटतं असतं की आपण सुंदर दिसावं. त्यासाठी स्त्रिया अनेक प्रयत्नही करत असतात. मग त्या सुंदर दिसण्यासाठी छो-छोट्या गोष्टींची काळजी घेतात. यामध्ये मग आयब्रोज, केस किंवा नखे अशा प्रत्येक गोष्टींकडे त्या बारकाईने लक्ष देत असतात. यामधील महिला आयब्रोज करण्यासाठी वेळच्या वेळी पार्लरमध्ये जातात. परंतु एक गोष्ट त्यांना खात असते ती म्हणजे काहींच्या आयब्रोज एकदम पातळ असतात.

काही स्त्रियांचे आयब्रोज हे दाट असतात जे खूप सुंदर दिसतात. पण बहुतेक स्त्रियांचे आयब्रोज हे पातळ असतात. त्यामुळे अशा स्त्रिया हे पातळ आयब्रोज लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. तर काही स्त्रिया आयब्रोज दाट करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर एक घरगुती उपाय आहे ज्यामुळे तुमचे आयब्रोज दाट होण्यास मदत होईल.

तुम्हाला जर तुमचे आयब्रोज दाट करायचे असतील तर मेथीच्या दाण्यांच्या पाण्यापासून तुम्हाला नक्कीच रिजल्ट मिळेल. कारण मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमचे आयब्रोज दाट करण्यास मदत करतात. तर  मेथी दाणा आयब्रोज ग्रोथ वॉटर कसं बनवायचं याबाबत जाणून घेणार आहोत.

मेथी दाणा आयब्रोज ग्रोथ वॉटर बनवण्यासाठी 1 कप मेथीचे दाणे आणि पाणी घ्या. त्यानंतर रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. मग सकाळी भिजलेल्या मेथीच्या दाण्यांची स्मूथ अशी पेस्ट तयार करा. मग तुमचं मेथीच्या दाण्यांनी तयार केलेलं आयब्रोज ग्रोथ वॉटर रेडी होतं.

मेथी दाणा आयब्रोज ग्रोथ वॉटरला घेऊन ते तुमच्या आयब्रोजला नीट लावा. त्यानंतर ते तुमच्या आयब्रोजवर तसंच 10 मिनिटे ठेवा. त्यानंतर तुमचे आयब्रोज पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तसंच जर तुम्हाला चांगला रिजल्ट हवा असेल तर या वॉटरचा एक आठवडे वापर करा. मग बघा तुमचे आयब्रोज नक्कीच दाट होतील.