उन्हाळ्यात कूल राहायचंय? हे 6 घरगुती उपाय नक्की करून पाहा!

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे नैसर्गिक उपाय खूप प्रभावी ठरतात. नारळ पाणी, ताक, बडीशेप, कोरफडीचा रस, कस्तुरी आणि टरबूज, आणि गूळ हे सर्व उपाय शरीराला थंड ठेवण्यास आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या सोप्या उपायांचा वापर करून तुम्ही आरामदायक आणि ताजेतवाने राहू शकता.

उन्हाळ्यात कूल राहायचंय? हे 6 घरगुती उपाय नक्की करून पाहा!
body heat
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 2:42 PM

उन्हाळा आला की शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात, यामुळे आपल्या शरीरात पचनाच्या समस्या, ॲसिडिटी आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या निर्मान होतात. जर आपल्या आहारात थोडे बदल करून, नैसर्गिक उपायांचा वापर केला तर शरीरातील उष्णता सहज कमी होते.

1.नारळ पाणी : नारळ पाणी हे एक उत्कृष्ट नैसर्गिक ड्रींक आहे जे फक्त पोटातील उष्णता शांत करत नाही, तर शरीरात हायड्रेशन देखील राखते. उन्हाळ्यात थंड आणि ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.

2. ताक : ताक हे देखील पोटाची उष्णता कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. थंड ताकामध्ये काळे मीठ आणि भाजलेले जिरे टाकून त्याचे सेवन केल्याने पोट शांत होते आणि ॲसिडिटी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही नियमितपणे ताक पिऊन उष्णतेपासून आराम मिळवू शकता.

3. बडीशेप : जेवल्यानंतर बडीशेप खाणे किंवा बडीशेपाचे पाणी पिणे हे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

4. कोरफडीचा रस : कोरफडीचा रस हा शरीराच्या उष्णतेला कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. 10-15 मिली कोरफडीचा रस पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या यामुळे पोट फुगणे आणि जळजळ होणे कमी होईल

5. कलिंगड : कलिंगड या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीर आणि पोट दोन्ही थंड ठेवते. कलिंगड खाल्ल्यामुळे शरीरात उष्णतेचा स्तर कमी होतो, आणि तुम्हला ताजेतवाने वाटते.

6. गूळ : उन्हाळ्यात थोडासा गूळ चोखून किंवा पाण्यात विरघळवून प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो. गूळ हे पचण्यास सोपे आहे आणि त्यात असलेले मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)