AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर औषधांऐवजी ‘या’ 3 फळांचे करा सेवन, त्वरित मिळेल आराम

तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास सतत होतोय, पण त्यापासून आराम मिळावा म्हणून औषध खाऊन कंटाळा आलाय? तर या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी फक्त या 3 फळांचे सेवन करा. चला तर मग कोणती आहेत ही फळे याबद्दल जाणून घेऊयात.

वारंवार बद्धकोष्ठता होत असेल तर औषधांऐवजी 'या' 3 फळांचे करा सेवन, त्वरित मिळेल आराम
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 17, 2026 | 3:53 PM
Share

चुकीच्या जगण्याच्या शैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढतच आहे. बद्धकोष्ठता हा एक छोटासा शब्द वाटेल. पण ज्यांना दररोज या समस्येचा सामना करावा लागतो त्यांनाच समजू शकते की ही समस्या किती मोठी आहे. त्यातच बद्धकोष्ठतेची अनेक कारणे असू शकतात. खरं तर बद्धकोष्ठता तेव्हा होते जेव्हा तुमच्या आतड्यांची हालचाल कमी होते किंवा आतडे नियमितपणे काम करत नाही आणि शौचास त्रास होतो . फायबरची कमतरता आणि पाण्याची कमतरता खाण्याच्या चुकीच्या पद्धती, अवेळी झोपणं ही याची मुख्य कारणे आहेत. तोव काही औषधे देखील बद्धकोष्ठतेला कारणीभूत ठरू शकतात. दीर्घकाळ बद्धकोष्ठतेमुळे गॅस, जडपणा, अपचन आणि शरीरातील विषारी पदार्थांचे संचय होऊ शकते. जर तुम्हीही या समस्येपासून मुक्त होण्यासाठी स्वस्त आणि सोपा घरगूती उपाय आहेत जे ही समस्या छुमंतर करून टाकतील. बद्धकोष्ठतेच्या वाढत्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही या तीन फळांचा आहारात समावेश करा. कोणताही विलंब न करता कोणती फळं खाणे फायद्याचे ठरेल ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत?

1. किवी-

किवीमधील नैसर्गिक एंजाइम आणि फायबर आतड्यांच्या हालचालींना उत्तेजन देतात. दररोज एक ते दोन किवी खाल्ल्याने आतड्यांमधील सूज कमी होते, ज्यामुळे ते दीर्घकालीन बद्धकोष्ठतेसाठी एक सुरक्षित उपाय ठरते. किवी हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानले जाते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि शरीराला असंख्य फायदे देते.

2. मनुके

सुकलेल्या मनुकांमध्ये फायबर आणि सॉर्बिटॉल असे घटक असते, जे मल मऊ करते. त्यात फायबर, सॉर्बिटॉल आणि फेनोलिक संयुगे असतात, जे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतात. दररोज 3 ते 4 भिजवलेले मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

3. नासपती( पेर)

नासपतीमध्ये फायबर विशेषतः पेक्टिन, पाणी आणि सॉर्बिटॉल भरपूर प्रमाणात असते, जे मल मऊ करते आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. नाश्त्यानंतर नासपती हे फळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. शिवाय, त्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार