Eating Bad Habit | रोज खात असाल पांढरे ब्रेड, तर सावध व्हा; या आजारांना देत आहात आमंत्रण!

| Updated on: Dec 29, 2021 | 11:42 AM

पांढऱ्या ब्रेडचा वापर केल्यामुळं रक्तदाबाचं प्रमाण जास्त होते. त्यामुळं आजाराला माणूस बळी पडतो. पांढरा ब्रेड वजन वाढविण्यासाठी मदत करतो.

Eating Bad Habit | रोज खात असाल पांढरे ब्रेड, तर सावध व्हा; या आजारांना देत आहात आमंत्रण!
bread
Follow us on

नाश्त्यामध्ये ब्रेड खाण्याची संकल्पना वाढत आहे. फ्रिजमधून ब्रेड काढले की गरम बटर लावून खाल्ले जाते. यासाठी पाच मिनीटही लागत नाहीत. वेळेच्या व्यवस्थापनासाठी हे आवश्यक आहे. परंतु, कोणते ब्रेड खाल्ले पाहिजे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे.

सकाळी नाश्त्यात काय खाल्ले पाहिजे हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न असतो. यामुळंच सकाळी नाश्ता असो की, संध्याकाळचा हल्का नाश्ता आपण ब्रेड खाणे पसंत करतो. बऱ्याच घरी नाश्त्याची सुरुवात ब्रेडनंच होते. शाळेत जाणारी मुलं असोत की, कार्यालयात जाणारे युवक प्रत्येकाला ब्रेड पसंत असतात. कारण ब्रेड पचायला हलके असतात.
पण, ब्रेड खाणे जेवढे स्वादिष्ट असते, तेवढे नुकसानकारकही. ब्रेडमध्ये पोटेशियम ब्रोमेट असते. हे आपल्या आरोग्यासाठी घातक असते. जर तुम्ही नेहमी पांढरा ब्रेड खात असाल, तर आरोग्याशी संबंधित आजार होऊ शकतात. पोषणाच्या बाबतीत पांढरा ब्रेड काहीही उपयोगी नसतो. जास्त खाल्ला जाणारा पांढरा ब्रेड आरोग्यासाठी नुकसानदायक असतो. जर तुम्ही पांढरा ब्रेड नेहमी खात असाल, तर ते खाणे बंद करा. याच कारण जाणून घ्या.

 

कसे बनतात पांढरे ब्रेड

पांढरे ब्रेड तयार करण्यासाठी गहू किंवा मैद्याचा वापर केला जातो. यासाठी वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळं ते पांढऱ्या रंगाचं होतं. मैद्यात पॅरोक्साई़, क्लोरीन डाइऑक्साइड आणि पोटेशियम ब्रोमेटसारखे रसायन ब्रेड तयार करताना वापरले जातात. यामुळंच पांढरे ब्रेड शरीरासाठी धोकादायक असतात.

 

पांढऱ्या ब्रेडचा वापर करू नये

पांढरे ब्रेडमध्ये कॅलरीजची मात्रा कमी असते. या ब्रेडमध्ये 77 कॅलरीजची मात्रा असते. पण, ग्लाइसेमिक इंडेक्स मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळं यात पोषणकत्त्व नाहीच्या बरोबर असतात.

 

रक्तदाबाचे प्रमाण वाढते

पांढऱ्या ब्रेडमध्ये ग्लाइमेक्सचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ ग्लुकोजचं प्रमाण वाढते. रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. पांढऱ्या ब्रेडचा वापर केल्यामुळं रक्तदाबाचं प्रमाण जास्त होते. त्यामुळं आजाराला माणूस बळी पडतो. पांढरा ब्रेड वजन वाढविण्यासाठी मदत करतो.

Nagpur Corona | धोका वाढला! सहा महिन्यांनंतर रुग्णसंख्येचा उच्चांक; नागपुरात आढळले 44 नवे कोरोना बाधित

Pench Tiger | गंभीर जखमी अवस्थेत फिरत होती वाघीण; मृत्यू कशामुळं झाला असेल यावर चर्चा?

NMC Election | नागपूर मनपा निवडणूक मेपर्यंत पुढे जाणार? ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत पदाधिकाऱ्यांना निवडणुका