Bones | हाडांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आहारामध्ये फक्त ‘या’ 3 पदार्थांचा समावेश करा!

| Updated on: May 30, 2022 | 9:41 AM

तुम्ही व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनीयुक्त असलेल्या आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामुळे हाडदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला हवे असेल तर सकाळी लवकर आवळ्याचा रस पिऊन तुम्ही निरोगी राहू शकता. यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर एनर्जी राहील.

Bones | हाडांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आहारामध्ये फक्त या 3 पदार्थांचा समावेश करा!
Image Credit source: organicfacts.net
Follow us on

मुंबई : 30 वर्षांचे झाल्यावर आपली हाडे (Bones) जवळजवळ पूर्ण विकसित होतात. हाडे मजबूत असणे निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, अगदी कमी वयामध्ये अनेकांची हाडे कमकुवत होतात. यामुळे बसताना किंवा उठताना हाडांमधून आवाज येतो. तसेच हाडांमधून वेदना (Pain) देखील होण्यास सुरूवात होते. हाडे कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीरात कॅल्शियमची कमतरता. जर तुम्हालाही कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काही कॅल्शियमयुक्त (Calcium) पदार्थांचा आहारात मसावेश करू शकता. ज्यामुळे हाड दुखीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

आवळा

तुम्ही व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यासारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनीयुक्त असलेल्या आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामुळे हाडदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला हवे असेल तर सकाळी लवकर आवळ्याचा रस पिऊन तुम्ही निरोगी राहू शकता. यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर एनर्जी राहील. तसेच आवळ्याचा रस पिल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

दूध

दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो. बाजारात मिळणारे दूध भेसळयुक्त आहे असे वाटत असेल तर गोशाळेसारख्या ठिकाणाहून ताजे आणि भेसळविरहित दूध घेऊ शकता. दूधाचे सेवन केल्याने हाडांची समस्या दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला दूध पिण्यासाठी आवडत नसेल तर तुम्ही दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे देखील सेवन करू शकता.

जिरे

जिरे हे प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये सहज मिळतात. जिरे हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळा. आता हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमच्या पोटातही थंडावा राहील. तसेच जर तुम्हाला हे पाणी पिणे शक्य नसेल तर तुम्ही वरण, भाजी आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये जिऱ्याचा जास्त समावेश करावा. यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळेल.