CANCER SURVIVORS DAY : ‘त्यांच्या’ आयुष्यात आनंद भरणाऱ्या ‘उगम’चा वर्धापन दिन जल्लोषात, 400 हून अधिक कॅन्सर पीडितांची उपस्थिती

| Updated on: Jun 05, 2022 | 8:30 PM

CANCER SURVIVORS DAY : बीपीसीएल इंडियन कॅन्सर सोसायटीशी भागीदारी करून एकात्मिक कॅन्सर केअर अँड क्युअर प्रोग्रामला सहाय्यता करत आहे, ज्यात कॅन्सर केअरच्या "प्रतिबंधात्मक" तसेच "उपचारात्मक" आयामांचा समावेश आहे.

CANCER SURVIVORS DAY : त्यांच्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या उगमचा वर्धापन दिन जल्लोषात, 400 हून अधिक कॅन्सर पीडितांची उपस्थिती
'त्यांच्या' आयुष्यात आनंद भरणाऱ्या 'उगम'चा वर्धापन दिन जल्लोषात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: इंडियन कॅन्सर सोसायटीच्या (Indian Cancer Society) सर्व्हायव्हरशीप उपक्रमातील सर्वात तरुण ग्रुप ‘उगम’ (UGAM)चा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या आफ्टर कम्प्लिशन ऑफ थेरपी (ACT) क्लिनिकमधून बाल कर्करोगातून वाचलेल्यांनी तयार केलेल्या एका सपोर्ट ग्रुपने ‘कॅन्सर सर्व्हायव्हर्स डे’ निमित्त आज उगमचा 13 वा वर्धापन दिन साजरा केला. हा दिवस दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातील रविवारी साजरा केला जातो. बालपणात होणाऱ्या कर्करोगावर योग्य उपचार होण्यासाठी जागृतता निर्माण करण्यासाठी व्हॅलिंटरी ग्रुपची 2009मध्ये स्थापना करण्यात आली होती. आठवड्याच्या अखेरीस ‘उगम’ने 13 वा वर्धापन दिन अत्यंत जल्लोषात साजरा केला. मुंबईतल्या नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाची थीम ‘रिश्ते’ला सन्मानित करण्यासाठी या सोहळ्यात 400 हून अधिक कॅन्सरवर मात केलेल्या विजेत्‍यांचा (कॅन्‍सर सर्व्‍हायवर्स) उत्‍साहपूर्ण सहभाग दिसून आला.

या सोहळ्याची सुरुवात प्रार्थना आणि गाण्याने झाली. त्यानंतर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक, डॉ. सी. एस. प्रमेश यांचे उद्घाटनपर भाषण झाले. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सहायता समूहाच्या कार्याला सलाम केला. त्यानंतर सुमारे 100 हून अधिक सहभागींनी नृत्य, अभिनय आणि रॅम्प वॉक द्वारे आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हे सुद्धा वाचा

त्यांचं मनोधैर्य वाढवण्यात यशस्वी

“कॅन्सर पीडितांचं मनोबल वाढवण्याबरोबरच वाचलेल्या कॅन्सर पीडितांना शून्यातून उभं करण्यासाठी मदत करण्याचं गेल्या 13 वर्षापासून अनन्यसाधारण काम केल्याबद्दल उगमला अभिमान आहे. आजपर्यंत, आम्ही कर्करोगातून वाचलेल्या बऱ्याच तरुणांचं मनौधर्य वाढविण्यात यशस्वी झालो आहोत, हे तरुण आता सामान्य जीवन जगत आहेत आणि त्यांच्या व्यावसायिक जीवनातही उच्चपदावर आहेत.”, असं उगम चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्स सपोर्ट ग्रुप, इंडियन कॅन्सर सोसायटीच्या संयोजक डॉ. पूर्णा ए. कुरकुरे यांनी सांगितलं.

त्यांचा सत्कार

यावेळी ‘उगम’च्या सदस्यांमध्ये गोलमेज चर्चासत्रं आयोजित करण्यात आलं होतं. त्याला ‘चाय विथ उगम’ हे नाव देण्यात आलं होतं. ही एक अनोखी मालिका असून जी कर्करोगातून बचावलेल्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करते आणि ICS द्वारे वितरीत केलेल्या शैक्षणिक आणि इतर अभ्यासक्रमांची घोषणा तसेच त्यांच्या वृत्तपत्राचे प्रकाशन करते. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी कार्यक्रमातील सर्व सहभागींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

पीडितांना सशक्त बनवण्याचं मिशन

“आमचं मिशन हे तरुण पीडितांना सशक्त बनविण्यासाठी समर्पित करण्यात आलं आहे. बालपणातील कॅन्सरवर मात करणाऱ्या प्रत्येकाला, कॅन्सरची लढाई जिंकलेल्या प्रत्येकाला आपले जीवन आपल्या पद्धतीने उत्साहात साजरे करण्याचा मार्ग शोधून निरोगी जीवन जगावे यासाठी उगमचा दृष्टीकोण सुनिश्चित करायचा आहे. तसेच कोविड नियमांचं पालन करून हा कार्यक्रम करण्याची आम्हाला परवानगी दिल्याबद्दल आम्ही वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठानचे आभारी आहोत,” असं UGAM- चाइल्डहुड कॅन्सर सर्व्हायव्हर्स सपोर्ट ग्रुप, इंडियन कॅन्सर सोसायटीच्या संयोजक डॉ. पूर्णा ए. कुरकुरे म्हणाल्या.

कॅन्सरमधून वाचलेल्यांचं पुनर्वसन

“कर्करोगाचे लवकरात लवकर निदान झाल्यानंतर अनेक प्रकारच्या कर्करोगावरील उपचार सुधारण्यास कॅन्सर केअरकडून मदत होऊ शकते. आर्थिक चणचण, सामाजिक कलंकाची भीती किंवा अगदीच माहितीचा अभाव आदी कारणांमुळे लोक कॅन्सरची प्राथमिक अवस्था असताना उपचारासाठी येत नाहीत. बीपीसीएल इंडियन कॅन्सर सोसायटीशी भागीदारी करून एकात्मिक कॅन्सर केअर अँड क्युअर प्रोग्रामला सहाय्यता करत आहे, ज्यात कॅन्सर केअरच्या “प्रतिबंधात्मक” तसेच “उपचारात्मक” आयामांचा समावेश आहे. या प्रकल्पात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील तोंडाच्या, गर्भाशयाच्या मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासाठी कॅन्सर तपासणी शिबिरांचा समावेश आहे, तसेच 10 सरकारी/लाभ न मिळणारे रुग्णालये पॅन इंडियाद्वारे कर्करोगाच्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्य तसेच सर्वायव्हरशिप आणि कॅन्सरमधून वाचलेल्यांसाठी पुनर्वसन कार्यक्रमांचा समावेश आहे,” असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)ने स्पष्ट केले.

इंडियन कॅन्सर सोसायटी विषयी

इंडियन कॅन्सर सोसायटी (ICS) ची स्थापना 1951 मध्ये डॉ. डीजे जुसावाला आणि श्री नवल टाटा यांनी कर्करोगासाठी भारतातील पहिली गैरलाभार्थी संस्था म्हणून केली होती. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या उपक्रमांमध्ये कॅन्सरची काळजी, कॅन्सर जागरूकता, लवकर तपासणीसाठी स्क्रीनिंग आणि उपचारांसाठी आर्थिक मदत, सहाय्यक गट, कॅन्सरमधून वाचलेल्यांचे पुनर्वसन, वैद्यकीय, संशोधन आणि नोंदणी यासह शिक्षणाचा समावेश आहे.

‘उगम’ विषयी

‘उगम’ हा एक स्वैच्छिक सहाय्य गट आहे. तो टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या आफ्टर कम्प्लिशन ऑफ थेरपी (ACT) क्लिनिकमधून चाइल्डहुड कॅन्सर सर्व्हायव्हर्सने तयार केला आहे. हा ग्रुप जगभरातील वाचलेल्या लोकांपासून प्रेरित आहे. ज्यांच्याशी त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी (SIOP) दरम्यान संवाद साधला होता. ) ऑक्टोबर 2007मध्ये ही बैठक झाली होती. जूनच्या पहिल्या रविवारी जगभरात कर्करोग बचाव दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी औपचारिकपणे 7 जून 2009 रोजी उगमची सुरूवात झाली.