इंटरमिटेन्ट फास्टींग करताय, सावधान, वाढू शकतो हृदयविकारांचा धोका, रिसर्चने केला दावा

जर तुम्ही वजन घटवण्यासाठी इंटरमिटेन्ट फास्टींग करत असाल तर वेळीच सावध व्हा. 16 तास उपाशी राहिण्याचा पॅटर्न तुमच्या हृदयाला कमजोर करु शकतो. समजून घ्या का धोकादायक होऊ शकते इंटरमिटेन्ट फास्टींग

इंटरमिटेन्ट फास्टींग करताय, सावधान, वाढू शकतो हृदयविकारांचा धोका, रिसर्चने केला दावा
Intermittent fasting
| Updated on: Aug 25, 2025 | 4:10 PM

वजन घटवणे, ब्लड शुगर कंट्रोल करणे आणि मेटाबोलिझ्म हेल्थ सुधारण्यासाठी फिटनेसच्या जगात रोज नवनवे ट्रेंड्स लोक आत्मसात करत आहेत. यात एक ट्रेंड खुपच चर्चेत आहे आणि तो म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग होय. परंतू यात काही धोके देखील आहेत. खासकरुन 16 : 8 चा पॅटर्न यात दिवसातून केवळ 8 तास जेवण घ्यायचे आणि 16 तास उपाशी रहायचे हा ट्रेंड सध्या आहे. या पॅटर्नचे रिझल्ट धक्कादायक आहेत.

अलिकडे Diabetes & Metabolic Syndrome जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च संदर्भात सांगितलेले आहे. या संशोधनाच्या मते इंटरमिटेन्ट फास्टींग हा पॅटर्न हृदयासाठी धोकादायक ठरु शकतो. 16:8 इंटरमिटेन्ट फास्टींग,यात लोक 8 तासात जेवतात आणि उर्वरित 16 तासात उपवास करतात. हा पॅटर्न बऱ्याच काळाने हृदयासाठी धोकादायक ठरु शकतो. याने हदय रोगाचा धोका वाढू शकतो असे म्हटले जात आहे.

Trends च्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष नको

इंटरमिटेन्ट फास्टींग आता वजन कमी करणे आणि मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यास सध्या ट्रेंडमध्ये आहेत. परंतू आता असे उघड झाले आहे की हृदय आणि रक्तवाहिन्यांवर याचा सकारात्मक ऐवजी उलटा परिणाम होऊ शकतो. डायबिटीड जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार जेव्हा जेवणाचा टाईम विंडो खूपच छोटा असतो. उदा. 8 तासांचा असेल तर कार्डीओव्हॅस्कुलर मृत्यूचा जोखील दुप्पट होऊ शकते. हार्वर्ड हेल्थच्या एका लेखानुसार इंटरमिटेन्ट फास्टींग छोट्या काळात बीपी,कोलेस्ट्रॉल आणि वजनात सुधारणा आणू शकतो. परंतू याचे फायदे नेहमी 12 ते 16 आठवड्यांपर्यंतच मर्यादित राहातात. याहून अधिक उपास करणे धोकादायक ठरु शकते.

रिसर्चने केले सावधान

हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि काही युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात आढळले की बराच मोठा काळ हा 16:8 डाएट फॉलो करणाऱ्या लोकांत हार्ट अटॅक आणि कार्डीओव्हॅस्कुलर मृत्यूचा धोका दुप्पट वाढू शकतो. ज्यांना आधीपासूनच हृदयाचा आजार किंवा डायबिटीज आहे त्यांच्याही ही लक्षणे आढळली.

काय आहे नेमके कारणे

समस्या केवळ फास्टींगमध्ये नसून खाण्याच्या पॅटर्नमध्ये देखील आहे. जेव्हा लोक खूप काळ उपाशी रहातात. तेव्हा बरेचदा आठ तासांच्या विंडोत ज्यास्त कॅलरी आणि कम क्वालीटीचे जेवण घेतात. म्हणजे भूक मिटवण्यासाठी जंक फूड वा हाय कॅलरी डाएटचे सेवन वाढते. या शिवाय बराच काळ उपाशी राहिल्याने शरीरावर स्ट्रेस हार्मोनचा परिणाम होऊ शकतो.याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल अस्थिर होते. आणि पुढे जाऊन हार्टसाठी धोकादायक ठरु शकते.

सुरक्षित रहाण्यासाठी काय करायचे ?

डॉक्टरांचा सल्ला – डॉक्टरच्या सल्लानुसार जर तुम्हाला हृदय किंवा शुगर संबंधित समस्या असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्या शिवाय फास्टींग सुरु करु नये.

खाण्याची क्वालिटी – 8 तासात जे काही खाल त्यात हिरव्या भाज्या, फळे, हेल्दी प्रोटीन आणि मिलेट्सचा समावेश करा

लॉन्ग-टर्मवर उपाशी राहू नये  – फास्टींगला काही तासांसाठीच अवलंबा अधिक काळासाठी उपाशी राहू नका. यास कायमस्वरुपी अवलंबून राहू नयेत त्याने धोका वाढू शकतो..

शरीराचे ऐका  – जर फास्टिंगवर असताना चक्कर, थकवा वा अनियमित हार्टबीट सारख्या समस्या झाल्या तर ती तातडीने बंद करा