AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही पण अशीच चपाती भाजता का?वाढेल कॅन्सरचा धोका; लगेच बदला ही सवय

चपाती भाजण्याची योग्य पद्धत काय आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल कारण चपाती भाजण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. चला जाणून घेऊयात नक्की रोटी किंवा चपाती भाजण्याच्या अशा कोणत्या पद्धती आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. 

तुम्ही पण अशीच चपाती भाजता का?वाढेल कॅन्सरचा धोका; लगेच बदला ही सवय
chapatiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 4:47 PM
Share

भारतातील प्रत्येक घरात दररोज चपाती ही शक्यतो खाल्लीच जाते. चपात्या किंवा फुलके बनवण्यासाठी बऱ्याच घरात एक पद्धत वापरली जाते ती म्हणजे चपाती तव्यावर अर्धी भाजायची आणि नंतर थेट गॅसच्या आचेवर ठेवून ती फुगवणे. फुललेल्या चपात्या किंवा रोटी खायलाही गरम गरम छान लागतात. पण तुम्हाला हे जाणूव आश्चर्य वाटेल की चपाती भाजण्याची ही पद्धत कॅन्सरचा धोका वाढवू शकते. नक्की कोणत्या अशा चपाती भाजण्याच्या पद्धती आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचे धोके असतात.

उच्च तापमानावर रोटी भाजल्याने काही हानिकारक रसायने तयार होतात

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की उच्च तापमानावर रोटी भाजल्याने काही हानिकारक रसायने तयार होतात, जसे की HCA (हेटेरोसायक्लिक अमाइन्स) आणि PAH (पॉलीसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स), ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

2015 मध्ये ‘एनव्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार नैसर्गिक वायूच्या चुली कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड सारखे धोकादायक वायू आणि WHO च्या मानकांपेक्षा जास्त सूक्ष्म कण उत्सर्जित करतात. या वायूंचा श्वसनाचे आजार , हृदयरोग आणि कर्करोग यासारख्या समस्यांशी संबंध असू शकतो .

अशा पद्धतीने चपाती भाजणे धोकादायक असू शकतं का?

‘पोषण आणि कर्करोग’ या दुसऱ्या अभ्यासात असे म्हटले आहे की उच्च तापमानावर स्वयंपाक केल्याने कर्करोग निर्माण करणारी रसायने तयार होऊ शकतात. त्यामुळे प्रश्न असा पडतो की गॅसच्या आचेवर थेट रोटी, चपाती भाजणे धोकादायक असू शकतं का?

‘थेट आगीवर स्वयंपाक करणे…’

‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक’चे संचालक कपिल त्यागी यांच्या मते, ‘थेट आगीवर स्वयंपाक करणे कर्करोगाशी जोडले जाऊ शकत नाही. निश्चितच काही रसायने डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात, परंतु शरीरात स्वतःला बरे करण्याची क्षमता असते. जर कोणी असे अन्न जास्त काळ खाल्ले तरच त्याचा परिणाम होऊ शकतो. ते अधूनमधून खाल्ल्याने कोणतेही मोठे नुकसान होत नाही.’

जुन्या पद्धती जास्त सुरक्षित होत्या का?

पोषणतज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या मते, ‘एचसीए, पीएएच आणि अ‍ॅक्रिलामाइड सारखी रसायने विशेषतः जेव्हा स्टार्च आणि मांस शिजवले जातात तेव्हा तयार होतात. त्यांचा कर्करोगाशी थेट संबंध नाही, परंतु खबरदारी म्हणून आपण कोळशावर किंवा गावच्या जन्या पद्धतींच्या चुलींवर स्वयंपाक करणे टाळले पाहिजे. पूर्वी, कापडाच्या मदतीने भाकरी तव्यावर दाबून मंद आचेवर भाजली जात असे, जेणेकरून ती सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजेल आणि गॅसची थेट आग टाळता येईल. पण आता थेट आचेवर भाकरी भाजण्याचा ट्रेंड वाढला आहे. मग ती चुलीवर असो किंवा गॅसच्या आचेवर.

बहुतेक लोक भाकरी किंवा चपाती तव्यावर कमी आणि जास्त वेळ थेट गॅसवर ठेवून भाजतात. असे केल्याने चपाती आतून कच्ची राहते. कच्ची चपाती खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

चपाती भाजण्याची योग्य पद्धत काय?

चपाती भाजताना ती नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर शेकवा. बरेच लोक अर्धवट शेकवल्यानंतर चपाती थेट गॅसवर ठेवतात, परंतु असं करू नये. तव्यावरच चपाती नीट शेकवी तसेच मोठा गॅस करून चपाती भाजण्यापेक्षा कायम मध्यम किंवा मंद आचेवर चपाती भाजावी.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.