तुमचा मुलगा योग्य वेळी झोप घेत नाही? जाणून घ्या कारण आणि उपाय

टीनएजर्स मुलांमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असल्यामुळे त्यांच्या झोपेच्या पद्धतीवरही परिणाम होतो. म्हणूनच पालकांनी अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते. कारण चांगली आणि पुरेशी झोप ही त्यांच्या आरोग्याचा पाया आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची गुरुकिल्ली ठरते.

तुमचा मुलगा योग्य वेळी झोप घेत नाही? जाणून घ्या कारण आणि उपाय
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 12:44 AM

टीनएज हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक आणि संक्रमणाचा टप्पा असतो. या वयात शरीरात, मानसिकतेत आणि वागणुकीत मोठे बदल होतात. याच काळात बऱ्याच मुलांना झोपेची समस्या भेडसावू लागते. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार, १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांनी दररोज किमान ८ ते १० तासांची झोप घेतली पाहिजे. मात्र विविध अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, अनेक आशियाई आणि आफ्रिकन देशांतील मुले दररोज ८ तासांपेक्षाही कमी झोप घेतात. परिणामी, त्यांची शारीरिक व मानसिक वाढ अडचणीत येते.

टीनएजमध्ये झोप का कमी होते?

जेव्हा मुले प्यूबर्टीच्या टप्प्यात येतात, तेव्हा त्यांचा नैसर्गिक झोपेचा चक्र (Circadian Rhythm) बदलतो. लहान मुलांना रात्री ८-९ वाजता झोप येते, पण किशोरवयीन मुलांना ही सिग्नलिंग प्रक्रिया उशिरा कार्य करते. त्यामुळे त्यांना रात्री १० नंतर झोप येते आणि सकाळी लवकर उठणे त्यांच्यासाठी कठीण होते. यामागे हार्मोनल बदल प्रमुख कारण असतात.

याशिवाय, शालेय अभ्यास, गृहपाठ, प्रोजेक्ट्स, स्पर्धा परीक्षा तयारी, खेळ, मैत्रिणींसोबतचा वेळ आणि सोशल मीडिया यामुळे त्यांच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये झोपेसाठी वेळ उरत नाही. परिणामी, वीकेंडच्या दिवशी ते बराच वेळ झोपून ‘कॅच-अप स्लीप’ घेतात. याचा अर्थ असा की आठवड्यात कमी झोप झाल्यामुळे ते शनिवारी-रविवारी जास्त झोपून झोपेची भरपाई करतात. परंतु, ही सवय त्यांच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम करते आणि झोपेचा असंतुलित पॅटर्न निर्माण होतो.

या लक्षणांनी ओळखा मुलाला झोपेची समस्या आहे का?

  • दिवसाच्या वेळेत सतत झोप येणे किंवा डुलक्या लागणे
  • शाळेत किंवा अभ्यासादरम्यान थकवा जाणवणे
  • वीकेंडला दुपारपर्यंत झोपलेले दिसणे
  • एकाग्रतेचा अभाव आणि चिडचिडेपणा करणे
  • रात्री मोबाईल, लॅपटॉप वापरण्याची सवय

मुलांना झोपेची शिस्त लावण्यासाठी पालकांनी काय करावे?

1. रात्री झोपण्याचा आणि सकाळी उठण्याचा एक ठराविक वेळ ठेवावा आणि त्याचे पालन करायला लावा.

2. झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर थांबवा.

3. झोपण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करा जसं की मुलाच्या खोलीत शांतता, अंधार आणि थोडा थंड ठेवावा.ज्यांनी झोप पटकन लागेल.

4. मुलांना सुट्टीच्या दिवशीही नेहमीच्या वेळेत उठवा.

5. सकाळी नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवू द्या.

6. त्यांच्या रूटीनमध्ये झोपेचे महत्त्व समजावून सांगा आणि त्यानुसार एक टाईमटेबल तयार करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)