क्योंकि दाग अच्छे होते हैं! जाणून घ्या चिखलामुळे कशी वाढते इम्युनिटी

| Updated on: Dec 09, 2022 | 3:47 PM

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की चिखल हा आपल्या इम्युनिटीसाठी खूप फायदेशीर असतो.

क्योंकि दाग अच्छे होते हैं! जाणून घ्या चिखलामुळे कशी वाढते इम्युनिटी
Follow us on

नवी दिल्ली – आपण अनेक जाहिरातींमध्ये ऐकलं असेल की डाग चांगले असतात. पण हे खरं आहे. आजारी पडू नये तसेच कपडे खराब होऊ नयेत म्हणून अनेक पालक मुलांना मातीमध्ये किंवा चिखलात (mud) जाण्यापासून रोखतात. झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे आता मुलांनाही बाहेर खेळायला फारसे आवडत नाही. इंटरनेटच्या (internet) या युगात मुलं त्यांचा जास्तीत जास्त वेळ सोशल मीडिया किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्यात घालवतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की प्रत्यक्षात चिखल हा आपल्या इम्युनिटीसाठी (प्रतिकारशक्तीसाठी) (immunity) खूप फायदेशीर असतो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण संशोधनातून हेच समोर आले आहे.

यासंदर्भात अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार, बाहेरच्या वातावरणात असलेली धूळ आणि मातीफ्रेंडली माइक्रो-ऑर्गेनिज्म सह काम करतात, जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला ट्रेन करतात. त्याशिवाय ॲलर्जी, दमा, ताण-तणाव अशा विविध आजारांशी लढण्याची क्षमताही मिळते. या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, बाहेर करण्यात येणाऱ्या व्यायामामुळे केवळ स्ट्रेस-फ्री होत नाही तर माती आणि चिखल यासारख्या काही नैसर्गिक गोष्टींमध्ये असे अनेक शक्तिशाली सूक्ष्मजीव असतात, ज्यांचा मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

मुलांना मिळतील अनेक फायदे

हे सुद्धा वाचा

बाहेर खेळण्यामुळे मुलांना असे अनेक अनभव मिळतात, जे त्याच्या आयुष्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. उदाहरणार्थ, माती किंवा रेतीत खेळल्यामुळे मुलांची मोटर स्किल्स आणि इतर कौशल्य विकसित होण्यास मदत होते. याला सेन्सरीमोटर डेव्हलपमेंट असे म्हणतात. मुलांच्या शारीरिक आरोग्याचा विचार केला तर बाहेर खेळल्याने त्यांना ताकद मिळते आणि तग धरण्याची क्षमता हे दोन्ही विकसित होण्यास मदत होते. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)