Garlic Harmful Effects: ‘या’ आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी लसणापासून रहावे चार हात लांब

हिवाळ्यात लसूण खाण्याचे फायदे तुम्ही ऐकलेच असतील, पण काही लोकांनी त्याचे सेवन अजिबात करू नये. काही लोकांसाठी लसूण धोकादायक ठरू शकतो. तज्ज्ञांकडून याबाबत महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

Garlic Harmful Effects:  या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी लसणापासून रहावे चार हात लांब
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 12, 2023 | 5:33 PM

नवी दिल्ली – बहुतांश लोकांना असं वाटतं की, हिवाळ्यात लसूण (garlic) खाणे खूप फायदेशीर असते आणि यामुळे सर्दी आणि खोकल्यासह अनेक आजारांपासून बचाव होतो. लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात, हे खरं आहे. त्यामुळे अनेक लोक चविष्ट व हेल्दी जेवण (food) बनवताना त्यात लसूण वापरतात. लसूण खाण्याचे अनेक फायदे असतात, पण परंतु काही लोकांसाठी लसूण ‘विष’ ठरू शकते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, कारण हे खरं आहे. काही लोकांनी लसूण खाणे टाळले (avoid garlic) पाहिजे, अन्यथा त्यांना त्रास होऊ शकतो.

काय सांगतात तज्ज्ञ ?

लसूण फायदेशीर असते असे आयुर्वेदात सांगितले आहे, पण रक्तदाब, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ यासारख्या काही समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी लसूण खाऊ नये, असे डॉक्टरांना सांगितले. अन्यथा या समस्या आणखी वाढू शकतात आणि गंभीर परिस्थिती उद्भवल्यास रुग्णालयात जायचीही वेळ येऊ शकते, असेही डॉक्टरांनी नमूद केले. प्रत्येक व्यक्तीने लसूण जपून वापरावा, त्याचे जास्त सेवन करण्याची चूक करू नये, असेही डॉक्टर म्हणाले.

लसूणामुळे वाढू शकतात हे 4 आजार

– उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी कोणत्याही ऋतूत लसूण खाऊ नये. असे केल्याने त्यांचा रक्तदाब वाढू शकतो. लसणात काही घटक असतात, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

– आजच्या काळात अनेक लोकांना ॲसिडीटी आणि गॅसच्या समस्येमुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो. अशा लोकांनी लसूण खाऊ नये, अन्यथा त्रास वाढू शकतो. या लोकांनी लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– जर तुमच्या पोटात जळजळ होत असेल तर लसणापासून अंतर राखणे फायदेशीर ठरेल. लसूण हे उष्ण प्रकृतीचे असते, ते पोटात गेल्यास जळजळ वाढू शकते. याशिवाय उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठीही लसूण हानिकारक मानले जाते.

– लूज मोशनचा त्रास असेल तर त्या लोकांनाही लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो. लूज मोशन दरम्यान लसणाचे सेवन केल्याने तुम्ही अधिक अस्वस्थ होऊ शकता. म्हणूनच काळजी घेणे आवश्यक आहे.