सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे

Health Benefits of Eating Raw Garlic: लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर त्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. ते वजन कमी करण्यापासून मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉलपर्यंत नियंत्रित करण्यास मदत करतात. जाणून घेऊया रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे कोणते फायदे आहेत.

सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या आरोग्याला होणारे फायदे
| Edited By: | Updated on: Oct 29, 2026 | 5:54 PM

अन्नाची चव वाढवण्यासाठी अनेकदा लसणाचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. लसणामध्ये लोह, झिंक, तांबे, फायबर आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मही आढळतात. लसणाचे सेवन वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जाणून घेऊया रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे आणि त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत.

कच्चा लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या २-३ पाकळ्या चावून किंवा बारीक करून खाव्या. असे केल्याने लसूणमध्ये असलेले अॅक्टिव्ह कंपाऊंड शरीरात पोहोचते आणि चांगले कार्य करते. रोज अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने शरीराचा मेटाबॉलिक रेट सुधारतो आणि पचनही चांगले राहते. मात्र रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने काही लोकांना पोटदुखी, एलर्जी, अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लसणाचे सेवन करावे.

Loading...

हृदयाचे आरोग्य

लसूण केवळ रक्तदाबच नव्हे तर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तवाहिन्या कडक होण्यापासून रोखून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्त घट्ट होण्यापासून रोखले जाते आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळीही कमी राहते. या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत करतात.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी लसूणचे सेवन एखाद्या औषधापेक्षा कमी मानले जात नाही. लसूण शरीरातील साखरेची पातळी व्यवस्थापित करून रक्ताभिसरण देखील सुधारते.

इम्युनिटी बूस्ट करते

कच्चा लसूण अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फरयुक्त संयुगे समृद्ध असल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतो. कच्च्या लसणाच्या नियमित सेवनाने इन्फेक्शन आणि आजार टाळता येतात.

संधिवाताच्या दुखण्यावर फायदेशीर
दाहक विकार दूर करण्यासाठी कच्चा लसूण अत्यंत फायदेशीर आहे. कच्च्या लसूणमध्ये असलेल्या डायलिल डायसल्फाइडसारख्या अँटी इंफ्लेमेटरी संयुगे शरीराची सूज कमी करून संधिवात सारख्या परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वाढत्या लठ्ठपणामुळे तुम्हीही त्रस्त असाल तर लसणाचे सेवन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. कच्च्या लसूणचे सेवन केल्याने चयापचय वाढून चरबी बर्न होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने आतड्याचे आरोग्य चांगले राहते.

(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us