महिलांनो… ब्रा न घालण्याचे फायदे काय आहेत, माहीत आहे का ?

Benefits Of Not Wearing Bra : ब्रेसियर किंवा ब्रा न घातल्याने तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात.

महिलांनो... ब्रा न घालण्याचे फायदे काय आहेत, माहीत आहे का  ?
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 20, 2023 | 1:21 PM

नवी दिल्ली : ब्रेसिअर किंवा ब्रा (Bra) ही एक अशी गोष्ट आहे जी शरीराच्या वरच्या भागाला योग्य आकार देण्यास मदत करते. पण खरं सांगायचं झालं तर ब्रालेस (being Braless) होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी आरामदायी क्षणांपैकी एक आहे. त्याचा पट्टा उघडला की मोकळं वाटतं. त्यामुळे केवळ आरामाचीच अनुभूती मिळत नाही तर ब्रालेस असणे तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले असते… चला तर मग जाणून घेऊया ब्रा न घालण्याचे फायदे (Benefits Of Not Wearing Bra).

काय आहेत ब्रा न घालण्याचे फायदे

  1. घट्ट ब्रा घातल्याने तुमच्या रक्ताभिसरणात अडथळा येतो. घट्ट ब्रा तुमच्या स्तनाखालील रक्ताभिसरणावर परिणाम करते. यामुळे महिलांना छातीत दुखू लागते.रक्त परिसंचरण सुधारायचे असेल तर काही दिवस ब्रापासून दूर राहा.
  2. ब्रा न घालता झोपल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते, कारण जेव्हा तुम्ही ब्रा शिवाय झोपता तेव्हा तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय चांगला श्वास घेऊ शकता, ज्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
  3. ज्या महिलांना श्वसनाचा त्रास होत असेल त्यांना ब्रा घातल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. अशा महिलांसाठी ब्राशिवाय राहणे अधिक आरामदायक आहे.
  4. उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि अशा परिस्थितीत काही ब्राचे फॅब्रिक असे असते की ते योग्य नसतात आणि घाम शोषू शकत नाहीत. तुमच्या छातीत आणि तुमच्या ब्राच्या फॅब्रिकमध्ये खूप घर्षण होते, ज्यामुळे खाज सुटण्याची आणि पुरळ उठण्याची समस्या उद्भवते. घाम साचल्याने बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही वेळ ब्रा घातली नाही तर तुम्ही फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहू शकता.
  5. जर तुम्ही खूप घट्ट ब्रा घालत असाल तर स्तनांमध्ये सिस्ट किंवा अल्सर येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही ब्रालेस राहून हा धोका टाळू शकता.
  6. अनेक वेळा महिला पॅडेड ब्रा घालतात त्यामुळे निपलमध्ये समस्या निर्माण होते. निपलची त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे ती कोरडी पडू लागते आणि तिथे खाज सुटू लागते. काही वेळासाठी ब्रा न घालता राहिल्यास या स्थितीतून सुटका होऊ शकते.
  7. काही काळासाठी ब्रा शिवाय राहिल्याने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी खूप घट्ट ब्रा घातल्याने स्तनाच्या ऊतींचे नुकसान होते. ब्रा घातल्याने शरीरातील लिम्फॅटिक प्रणालीवर परिणाम होतो. जे पुढे ब्रेस्ट कॅन्सरचे कारण बनते. पण काही तज्ञ या मुद्याशी सहमत नाहीत.