चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ सोप्या 5 पदार्थ
पनीरमध्ये प्रथिने आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच पनीर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्हाला चव आणि पोषण दोन्ही हवे असेल, तर चला घरी सहज बनवता येतील अशा पाच चविष्ट आणि आरोग्यदायी पनीरच्या रेसिपी जाणून घेऊयात.

आजकाल बदलत्या खाण्या-पिण्याच्या सवयी अनेकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे लोकं निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. तुम्ही देखील तुमच्या आहारा प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करत असाल तर पनीर हा एक लोकप्रिय पर्याय आहे. कारण पनीर केवळ चविष्टच नाही, तर अनेक आवश्यक पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. शाकाहारी लोकांसाठी पनीर प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानला जातो आणि त्याचा विविध पदार्थांमध्ये सहजपणे समावेश केला जाऊ शकतो.
पनीरमध्ये प्रथिने , कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी12, रायबोफ्लेविन, सेलेनियम आणि आरोग्यदायी फॅट यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्याचे माफक प्रमाणात सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास, स्नायूंचे आरोग्य राखण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत होते. म्हणूनच ते संतुलित आहाराचा एक भाग मानले जाते. चला तर मग पनीर पासून काही आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
पनीर पासून बनवा हे 5 आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ
पनीर भुर्जी
पनीर चांगले मॅश करा. एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि सौम्य मसाले टाकून हे मिश्रण परतून घ्या. त्यानंता यामध्ये पनीर मिक्स करून 3 ते 4 मिनिटे शिजवा आणि नंतर वरून कोथिंबीर टाका. ही प्रथिनयुक्त रेसिपी शरीराला ऊर्जा देण्यास आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करू शकते.
ग्रिल्ड पनीर टिक्का
पनीरचे तुकडे दही, आले-लसूण, हळद, लाल मिरची आणि इतर मसाल्यांमध्ये 20 ते 30 मिनिटे मॅरीनेट करा. त्यानंतर पॅनला किंवा तव्याला थोडे तेल लावून ते ग्रिल करा. ही एक स्वादिष्ट, कमी तेलात केली जाणारी रेसिपी आहे, जी प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत मानली जाते.
पनीर सॅलड
पनीरचे छोटे तुकडे काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि लेट्यूससोबत मिक्स करा. त्यावर लिंबाचा रस, काळी मिरी आणि थोडा चाट मसाला टाकून सर्व्ह करा. हा एक हलका आणि पौष्टिक पदार्थ असून, तो प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने परिपूर्ण आहे.
पालक पनीर
पालक उकडून त्याची प्युरी बनवा. एका पॅनमध्ये कांदे, टोमॅटो आणि मसाले परतून घ्या, नंतर त्यात पालकाची प्युरी टाका. पनीरचे तुकडे या प्युरीत टाका आणि काही मिनिटे शिजवा. ही रेसिपी प्रथिने, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचे उत्तम मिश्रण मानली जाते.
पनीर सँडविच
गव्हाच्या ब्रेडमध्ये किसलेले पनीर, शिमला मिरची, कांदे, टोमॅटो आणि सौम्य मसाले टाका. त्यानंतर त्याला ग्रिलरवर हलके भाजून घ्या. हा एक झटपट आरोग्यदायी नाश्ता आहे, जो प्रथिने, कर्बोदके आणि भाज्यांचे पोषण देतो.
पनीर खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
पनीर नेहमी प्रमाणातच खा आणि ताजे पनीर वापरा. जास्त तेल, लोणी किंवा मलई वापरून बनवलेले पनीरचे पदार्थ वारंवार खाणे टाळा. कमी फॅटयुक्त पनीर निवडा हा एक चांगला पर्याय असू शकतो, विशेषतः जर वजन किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रणाची चिंता असेल.
पनीरचा संतुलित आहारात समावेश करा आणि ते भाज्या व संपूर्ण धान्यांसोबत सेवन करा. जर तुम्हाला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असेल किंवा काही विशिष्ट आरोग्य समस्या असतील, तर त्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)