आवळ्याचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे अनेकांना माहित नाहीत

| Updated on: Feb 21, 2024 | 11:10 PM

चुकीची जीवनशैला आणि धावपळीमुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देता येत नाही. त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्यांचा आणि आजारांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला यापासून लांब राहायचे असेल तर तुम्ही दररोज आवळ्याचा चहा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल.

आवळ्याचा चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे अनेकांना माहित नाहीत
Follow us on

Benefits of Amla tea : चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याया वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न करु शकता. आवळा हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने केस, डोळे आणि त्वचेसाठी ते अधिक फायदेशीर मानले जाते. आवळा रोज खात असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते. आवळा खाल्ल्याने लठ्ठपणाही देखील दूर होते. पण जर तुम्ही रोज सकाळी आवळ्याचा चहा पित असाल तर याचे देखील अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. आवळा चहा प्यायल्याने पोटात साचलेली घाणही बाहेर पडते.

आवळा हे फळ आपले शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. आवळ्याचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेणार आहोत.

आवळा चहा कसा बनवायचा

आवळा चहा बनवण्यासाठी प्रथम तुम्ही २ कप पाणी उकळत ठेवावे. त्यामध्ये थोडे आले किसून टाकावे. 4-5 तुळशीची पाने घालावी. आता 1 चमचा आवळा पावडर पाण्यात घालून उकळू द्या. जेमतेम अर्धे पाणी उरले की गॅस बंद करा आणि गाळून प्या. आता चहासारखे कोमट करुन तुम्ही ते पिऊ शकता.

तुम्ही चहा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पेय किंवा स्मूदीमध्ये अशा प्रकारे आवळा पावडर वापरू शकता. सर्व प्रथम, रिकाम्या पोटी आवळा चहा प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरात साचलेली घाणही सहज निघून जाते.

आवळा चहा पिण्याचे फायदे

आवळ्याचा चहा जर तुम्ही दररोज पित असाल तर तुमची पचनक्रिया मजबूत होत जाते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. आवळा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. याच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळा चहा चयापचय गतिमान करण्याचे काम करते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.