Health Tips : एक चुटकी शहद की किमत तुम क्या जानो?  प्रदीर्घ आयुष्य जगायचंय? वाचा मधाचे फायदे

| Updated on: Jul 15, 2022 | 6:07 PM

Benefits of Honey : योग्य आणि चौरस आहार खाल्ल्यास जीवनातील अनेक गोष्टी बदलू शकतात. तसेच ताण-तणाव आणि चिंताही कमी होतात. रोज एक चमचा मध खाणे स्त्रियांसाठी खूप फायदेशीर ठरते.

Health Tips : एक चुटकी शहद की किमत तुम क्या जानो?  प्रदीर्घ आयुष्य जगायचंय? वाचा मधाचे फायदे
रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध खा !
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Health Tips : आजच्या धावपळीच्या , तणावाच्या जीवनात (Busy lifestyle) फिट राहणे, निरोगी जीवन जगणे ही काही सोपी गोष्ट नाही. विशेषत: महिलांसाठी हे कठीण ठरते. घर आणि ऑफीसचे या दोन्ही आघाड्यांवर संतुलितपणे आणि यशस्वीपणे काम करता करता त्यांची खूपच दमणूक होते. त्यामुळे त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष नसते. पुरेसा चौरस आहार (Food), शांत झोप, थोडाफार व्यायाम या सर्व गोष्टींमुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच ताण-तणाव आणि चिंताही कमी होतात. मात्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध कामांत अडकलेल्या स्त्रियांना स्वत:कडे लक्ष द्यायला खरंच पुरेसा वेळ मिळतो का? रोज एक चमचा मधाचे (Honey) सेवन केल्याने स्त्रियांना निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यात मदत होते, असे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. मध ‘लिक्विड गोल्ड’ नावानेही ओळखला जातो. त्यामधील या पोषक तत्वांमुळे आपली प्रकृती निरोगी राहते तसेच प्रतिकारशक्तीही वाढते. मधामुळे तंदुरुस्त, शांत, निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. मधामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि स्मरणशक्तीही सुधारते. वाढत्या वयामुळे पडणाऱ्या सुरकुत्या (मधामुळे) कमी होतात जाणून घेऊया , या मधाचे काय फायदे आहेत.

लिक्विड गोल्डचे गुणधर्म

मासिक पाळीदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. त्या विविध दुखण्यांमुळे कमजोरीमुळे त्रासलेल्या असतात. मात्र पूर्वीच्या काळातील बायका, किती मजबूत होत्या. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या आहारात असलेला मधाचा समावेश. ॲंटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठा स्त्रोत असलेला मध ‘लिक्विड गोल्ड’ नावानेही ओळखला जातो. त्यामधील या पोषक तत्वांमुळे आपली प्रकृती निरोगी राहते तसेच प्रतिकारशक्तीही वाढते. मधामुळे तंदुरुस्त, शांत, निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. मधामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि स्मरणशक्तीही सुधारते. ऋतूमानानुसार होणारे आजार, जसे की ताप, सर्दी , खोकला, घसा दुखणे, या सर्व दुखण्यांवरील इलाज म्हणजे मध. रोज एक चमचा मध खाल्याने खूप फायदे मिळतात. मधात ॲंटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, जे कॅन्सरपासून बचाव करतात. अशा अनेक कारणांमुळे महिलांनी रोज एक चमचा तरी हे ‘लिक्विड गोल्ड’ ( मध) खाल्लेच पाहिजे.

दुखण्यापासून मिळतो आराम

मासिक पाळी पूर्वी किंवा त्या दरम्यान अनेक स्त्रियांचे शरीर दुखते, पाठीतून, पोटातून कळा येतात, डोकं दुखत असतं. अशा अनेक दुखण्यांपासून आराम हवा असेल तर मध उपयुक्त ठरतो. कोमट पाण्यात एक चमचा मध घालून ते प्यायल्याने सर्व दुखण्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीरावरील सूज कमी होण्यासही मदत होते.

हे सुद्धा वाचा

हार्मोनल असंतुलन

महिलांचे हार्मोनल संतुलन बऱ्याच वेळेस बिघडते. टेस्टोस्टेरॉनच्या स्तरात बिघाड झाल्यामुळे हा त्रास सहन करावा लागतो. रोज मधाचे सेवन केल्यास टेस्टोस्टेरॉनचा स्तर संतुलित होतो.

ॲंटी एजिंग

दुखणे बरे करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे याशिवायही मधाच्या सेवनाच अनेक फायदे आहेत. वाढत्या वयामुळे पडणाऱ्या सुरकुत्या (मधामुळे) कमी होतात. रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यातून किंवा चहातून मधाचे सेवन करता येऊ शकते. एवढेच नव्हे तर मधामुळे त्वचेचा पोतही सुधारतो, ती चमकदार होते. दही किंवा बेसनात मध मिसळून तो लेप चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार बनते.