Mumbai | मुंबईत उद्यापासून शाळा सुरू; कशी असेल कोरोनोची नियमावली?
राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत.
राज्यातील कोरोना (Corona) विषाणू संसर्ग आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा (Mumbai School) उद्यापासून सुरु होत आहेत. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर बुधवारी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.मात्र, काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी आज मंगळवारी, 14 डिसेंबर रोजी सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात काही राहिलेल्या त्रुटींवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

