खरं की खोटं ? लसूण, कांदा आणि काळी मिरी खाल्ल्याने डास कमी चावतात का ?

| Updated on: Apr 29, 2023 | 5:19 PM

Myth Vs Truth : कांदा आणि लसूण यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने डास चावत नाहीत, असं तुम्हालाही वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नक्की वाचा

खरं की खोटं ? लसूण, कांदा आणि काळी मिरी खाल्ल्याने डास कमी चावतात का ?
लसूण, कांदा खाल्ल्याने डास कमी चावतात का ?
Follow us on

नवी दिल्ली : उन्हाळा आला की डासांचा (mosquitoes) त्रास सुरू होतो. काही लोकांना डासांचा इतका त्रास होतो की ते एका जागी 5 मिनिटेही बसू शकत नाहीत. त्याचबरोबर या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोकाही कायम आहे. म्हणूनच या डासांना हाकलण्यासाठी प्रत्येकजण शक्य ते सर्व प्रयत्न करतो. काही लोक स्प्रे- फवारणीचा अवलंब करतात, तर काही कॉईल जाळतात. काही लोकं उदबत्त्या, काही मॉर्टिन कॉइल अशा गोष्टींचा आधार घेतात. पण हे हट्टी डास जाण्याचे (to get rid of mosquitoes) नावही घेत नाहीत.

दुसरीकडे, काही लोकं असं मानतात की, जे लोक लसूण, कांदा, काळी मिरी यांसारख्या पदार्थांचे सेवन करतात, त्यांना डास कमी चावतात किंवा बिलकूल चावत नाहीत. कांदा आणि लसूण यांसारख्या गोष्टी खाल्ल्याने डास चावत नाहीत, असं तुम्हालाही वाटत असेल की सत्य जाणून घ्या. कांदा आणि लसूण सेवनाचा खरोखरच डास चावण्याशी संबंध आहे की नाही, याविषयी जाणून घेऊया.

तज्ज्ञ काया सांगतात ?

– लसूण, कांदा आणि काळी मिरी खाल्ल्यास डास चावणार नाहीत या गोष्टीत काहीह तथ्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण तुम्ही लसूण आणि कांदा त्वचेवर लावल्यास त्याच्या वासामुळे डास कदाचित तुमच्या जवळ येणार नाहीत.

– काळी मिरी खाणाऱ्या लोकांना डास कमी खातात यातही अजिबात तथ्य नाही. काळी मिरी पावडर त्वचेवर लावल्यास डास टाळता येतात. कारण काळ्या मिरीमध्ये capsaicin नावाचे संयुग असते जे त्वचेवर उष्णता निर्माण करते आणि त्यामुळे डास निघून जातात.

– त्याचप्रमाणे लसूण आणि कांदा खाण्याचाही डासांशी अजिबात संबंध नाही. कारण तुम्ही काय खाल्ले आहे याची डासांना कल्पना नसते. जरी तुम्ही लसूण आणि कांद्याची पेस्ट त्वचेवर लावली तर त्याचा वास डासांना तुमच्यापासून दूर ठेवू शकतो. डासांना हा वास अजिबात आवडत नाही.

हे घरगुती उपाय करून पहा

– जर तुम्हाला खूप डास चावत असतील तर कोणतीही क्रीम लावण्याऐवजी तुम्ही खोबरेल तेल आणि लिंबू मिसळून त्वचेवर लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेची हानीही होत नाही आणि डास दूर पळतात.

– डासांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्वचेवर पुदिन्याचे तेल लावले तरी डास तुमच्यापासून दूर राहतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)