Neem Face Masks: ग्लोइंग स्किनसाठी घरगुती कडुलिंबाचा फेस पॅक

| Updated on: Dec 13, 2021 | 4:34 PM

ऑफिसचे काम, ताणतणाव इत्यादी कारणांमुळे बहुतांश जणांच्या झोपेवर वाईट परिणाम होतात. यामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चेहरा निस्तेज दिसतो. तसंच सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने-प्रसन्नही वाटत नाही. झोप पूर्ण न झाल्यास आपल्या त्वचेवरही दुष्परिणाम दिसून येतात.

Neem Face Masks: ग्लोइंग स्किनसाठी घरगुती कडुलिंबाचा फेस पॅक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

कडुलिंब हा बहुतेक आयुर्वेदिक उपचारांचा एक भाग आहे. कडुलिंब आणि त्याच्या उत्पादनांचे अनेक सौंदर्य फायदे आहेत. हे तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या बहुतेक समस्या दूर करू शकते. यामुळेच कडुलिंबाचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांसाठी केला जातो.

त्यातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुरुम आणि मुरुमांच्या डागांशी लढण्यास मदत करतात. कडुलिंबापासून तुम्ही विविध प्रकारचे नैसर्गिक घरगुती फेस पॅक बनवू शकता. या फेसपॅकचा नियमित वापर केल्यास सुंदर, निरोगी त्वचा मिळण्यास मदत होईल.

बघूयात घरगुती कडुलिंबापासून फेसपॅक

कडुलिंब आणि मध फेस मास्क

तेलकट त्वचेसाठी कडुलिंब आणि मधाचा फेस मास्क हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. हा पॅक तेलाचे उत्पादन नियंत्रित करण्यास आणि थकलेल्या त्वचेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करतात. हा फेस मास्क बनवण्यासाठी मूठभर कडुलिंबाची पाने घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून बारीक करून घट्ट आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये एक चमचा सेंद्रिय मध घाला, चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 30 मिनिटांनंतर, ते धुवा.

कडुलिंब आणि गुलाबजल फेस मास्क

कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी गुणकारी आहे. गुलाबजलने चेह-यावरील छिद्र कमी करण्यासाठी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. कडुलिंब आणि गुलाब पाण्याचा फेस मास्क बनवण्यासाठी मूठभर कडुलिंबाची पाने सुकवून त्याची बारीक पावडर बनवा. पावडरमध्ये काही थेंब गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा.

कडुलिंब आणि बेसन फेस मास्क

हा फेस मास्क पिंपल्सची समस्या दूर करतो, डाग कमी करतो आणि त्वचा चमकदार बनवतो. हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन, एक चमचा कडुलिंब पावडर आणि थोडे दही मिसळून पेस्ट बनवा. प्रथम आपला चेहरा स्वच्छ करा आणि नंतर हा मास्क चांगला लावा. 15 मिनिटांनंतर ते धुवा. चांगले परिणाम मिळविण्यासाठी हा मास्क आठवड्यातून दोनदा वापरा.

कडुनिंब आणि कोरफड फेस मास्क

कडुनिंबाप्रमाणे कोरफड हा देखील एक उत्तम घटक आहे. तुम्ही हा पॅक तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. हा मास्क त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करेल. हा मास्क बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा कडुलिंब पावडर आणि दोन चमचे कोरफड जेल मिक्स करा. प्रथम, गुलाब पाण्याने आपली त्वचा पुसून टाका आणि नंतर ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांनंतर स्वच्छ धुवा आणि स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसून टाका.

इतर बातम्या-

Kashi Vishwanath Corridor: तो शिवाजी भी उठ खडे होते हैं, दिव्य काशी, भव्य काशीत मोदींकडून महाराजांचं स्मरण, साधू संतांकडून टाळ्यांचा गडगडाट

MIM खासदार इम्तियाज जलील यांची सरकारला ऑफर, मुस्लिम आरक्षण दिलं तर महापालिका निवडणुका लढणार नाही!