Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही घसरण सुरु

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 443 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 18 हजार 762 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही घसरण सुरु
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 10:10 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 1 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 306 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 443 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 443 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 18 हजार 762 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 41 लाख 89 हजार 774 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 67 हजार 367 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 54 हजार 712 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 67 हजार 695 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 102 कोटी 27 लाख 12 हजार 895 च्या वर गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 14,306

देशात 24 तासात डिस्चार्ज – 18,762

देशात 24 तासात मृत्यू – 443

एकूण रूग्ण – 3,41,89,774

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,67,695

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,35,67,367

एकूण मृत्यू  – 4,54,712

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 1,02,27,12,895

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

इतर बातम्या :

यूपीमध्ये फिरण्यासाठी ‘ही’ आहेत सुंदर ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या

दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!