Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी
गेल्या 24 तासात भारतात 58 हजार 419 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 576 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 87 हजार 619 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 81 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 58 हजार 419 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 576 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 58419 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 58 हजार 419 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 576 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 87 हजार 619 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 98 लाख 81 हजार 965 वर गेला आहे. देशात 2 कोटी 87 लाख 66 हजार 9 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 86 हजार 713 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 7 लाख 29 हजार 243 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 27 कोटी 66 लाख 93 हजार 572 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 58,419
देशात 24 तासात डिस्चार्ज – 87,619
देशात 24 तासात मृत्यू – 1576
एकूण रूग्ण – 2,98,81,965
एकूण डिस्चार्ज – 2,87,66,009
एकूण मृत्यू – 3,86,713
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 7,29,243
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 27,66,93,572
संबंधित बातम्या :
राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू
भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार