भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार

भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे.

भारतीयांना आणखी एक लस मिळणार, झायडस कॅडिला आपत्कालीन वापरासाठी 7 ते 8 दिवसांत अर्ज करणार
कोरोना लस
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 7:05 PM

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. (Zydus Cadila will apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine in next 7-8 days)

डीएनएवर आधारित कोरोना लस

झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणारी झायडस कॅडिला ही दुसरी कंपनी आहे. तर, डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील पहिली लस आहे. या लसीमध्ये विषाणच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करुन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

28 हजार स्वयंसेवकांची नोंदणी

निती आयोगाचे सदस्य वी.के.पॉल यांनी झायडस कॅडिलाकडे कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी तीन टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकांनी चाचणीसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली. झायडस कॅडिला लवकरच त्यांनी कोरोना लसीच्या चाचणीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आमच्याकडे सादर करेल, असं वी.के.पॉल म्हणाले. आम्हाला झायकोव-डी पासून अधिक अपेक्षा आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.

भारतात आतापर्यंत तीन लसींना मंजुरी

भारत सरकारनं आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाच्या स्पुतनिक वी लसीला मंजुरी  देण्यात आली आहे.

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार

झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज

(Zydus Cadila will apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine in next 7-8 days)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.