ओमिक्रॉनच्या ‘BA.4, BA.5’ची तामिळनाडू, तेलंगना, महाराष्ट्रात इन्ट्री, जाणून घ्या विषाणू किती धोकादायक

| Updated on: Jun 06, 2022 | 1:18 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट असेलेल्या बीए 4 आणि बीए 5 ला कारणीभूत मानण्यात येत आहे. जाणून घेऊयता भविष्यात हा विषाणू किती धोकादायक ठरू शकतो.

ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5ची तामिळनाडू, तेलंगना, महाराष्ट्रात इन्ट्री, जाणून घ्या विषाणू किती धोकादायक
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 4,518 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या शनिवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 5.8 टक्क्यांनी अधिक आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत गेल्या 24 तासांमध्ये 1,714 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी ओमिक्रॉनचे (Omicron) उपप्रकार असलेला BA.4 आणि BA.5 हा विषाणू कारणीभूत असल्याचे माणण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये BA.4 आणि BA.5 या विषाणूची लागण झालेले कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये दोन लोकांना BA.4 ची तर आठ जणांना BA.5 लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील BA.4 चे चार रुग्ण आणि BA.5चे तीन रुग्ण आढळून आले होते.

दक्षिण अफ्रिकेत आढळला पहिला रुग्ण

ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या या विषाणूचा उगम हा एप्रिल महिन्यात दक्षिण अफ्रिकेत झाला. दक्षिण अफ्रिकेत काही लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर आता या विषाणूचा प्रसार भारतात देखील झाला असून, भारतात महाराष्ट्र, तेलंगना आणि तामिळनाडूमध्ये BA.4 आणि BA.5 चे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा उपप्रकार असलेल्या बीए वन आणि बीए टू मुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे कोणत्याही प्रकारचा गंभीर धोका नाहीये. मात्र BA.4 आणि BA.5 च्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्ण वाढून चौथी लाट येऊ शकते. मात्र दुसरीकडे यूरोपियन सेंटर फॉर डिसीज कट्रोल या संस्थेकडून या विषाणूंचा समावेश हा धोकादायक विषाणूंमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत या सबव्हेरियंटमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आढळून आले नाही. मात्र याच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

चिंता का वाढली

भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. याला जबाबदार ओमिक्रॉनचा नवा सब व्हेरियंट BA.4 आणि BA.5 हे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. कोरोनाची तिसटी लाट ही बीए 1 आणि बीए 2 मुळे आली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. चौथी लाट ही बीए 4 आणि बीए 5 मुळे येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोरोनचाी चौथी लाट आल्यास रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे.