
Patanjali Oil : आजघडीला जगभरात लाखो लोक सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांना प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास पायात, गुडघ्यात जाणवतो. वाढत्या वयामुळे, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, मार लागल्यामुळे, युरिक अॅसिडची कमतरता भासल्यामुळे लोकांना सांधेदुखीचा त्रास चालू होतो. बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊनही लोकांना या त्रासापासून मुक्ती मिळत नाही. अशा स्थितीत अनेकांसाठी पतंजलीचे दिव्य पीडांतक तेल रामबाण उपाय ठरू शकते.
सांधेदुखीमुळे शरीराचे चक्र बिघडू शकते. शरीराच्या इतरही अवयवांच्या कमावर त्याचा नकारात्मक प्रभाव जाणवतो. सांधेदुखीचा हा त्रास कायम राहिल्यामुळे रोजची कामेदेखील करणे मुश्किल होऊन जाते. स्नायुंमध्ये कमजोरी निर्माण होते. या आजाराकडे फारच दुर्लक्ष केले तर वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. तसेच सांधेदुखीच्या त्रासामुळे झोप न लागण्याचा त्रास सुरु होतो. परिणामी थकवा, चिडचिड व्हायला लागते. अनेक वेळा सांधेदुखीमुळे मानसिक तणाव, डिप्रेशनचाही त्रास जाणवतो. त्यामुळे वेळीच या आजारावर उपचार घेणे गरजेचे आहे.
पतंजलीचे दिव्य पीडांतक तेल सांधेदुखीसाठी रामबाण औषध ठरू शकते. हे एक आयुर्वेदिक तेल आहे. हे तेल प्रामुख्याने सांधेदुखी, स्नायू, हाडांच्या दुखण्यात फार लाभदायी ठरू शकते. या तेलात अनेक नैसर्गिक वनस्पती असतात. म्हणूनच या तेलामुळे सूज कमी होते तसेच हाडे मजबूत होतात.
या तेलात अश्वगंधादेखील असते. यामुळे स्नायुंमधील सूज कमी होते. या तेलात तिळाचे तेल असते. यामुळे सांधे मजबूत होतात आणि ते लवकचिक बनतात. दिव्य पीडांतक तेलात जवसाचेही तेल असते. जवसात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
दिव्य पीडांतक तेल अगोदर हलकेसे गरम करून घ्यावे. त्यानंतर जिथे तुम्हाला त्रास होतो, त्या ठिकाणी या तेलाने 10 ते 15 मिनिटे मसाज करा. मालिश केल्यानंतर त्या भागाला कापडाने झाकून घ्या. जखम झालेल्या ठिकाणी हे तेल लावू नये. गर्भवती महिला तसेच अॅलर्जीची समस्या असणाऱ्यांनीही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे तेल लावावे.