‘त्या’ विधानाशी आमचा संबंध नाही; ‘सीरम’चं केंद्र सरकारला पत्रं

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेवर सीरमने स्पष्टीकरण दिलं आहे. (Serum Institute Distanced Itself From Its Executive Director Statement)

'त्या' विधानाशी आमचा संबंध नाही; 'सीरम'चं केंद्र सरकारला पत्रं
serum institute

नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेवर सीरमने स्पष्टीकरण दिलं आहे. जाधव यांच्या वक्तव्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही, असं सीरमने स्पष्ट केलं आहे. (Serum Institute Distanced Itself From Its Executive Director Statement)

सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे रोजी पत्रं पाठवून हे स्पष्टीकरण दिलं आहे. सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही. जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही. तसेच जाधव यांनी जे सांगितलं तो आमचा विचार नाही. हे मी तुम्हाला सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावतीने सांगत आहे, असं सिंह यांनी या पत्रात म्हटलं आहे.

कोविशील्डची निर्मिती करण्यास कटिबद्ध

कोविशील्डचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोविड 19विरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, असं सांगतानाच पुनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्तेही असल्याचं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे.

जाधव नेमकं काय म्हणाले?

जागतिक आरोग्य संघटनेची गाईडलाईन्स लक्षात घेऊन लसीकरणाला प्राधान्य द्यायला हवे होते. सुरुवातीला 30 कोटी लोकांना व्हॅक्सिन द्यायची होती. त्यासाठी 60 कोटी डोसची गरज होती, असं जाधव यांनी सांगितलं होतं. लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. यातून उत्पादनाची उपलब्धता पाहिली पाहिजे आणि न्यायसंगत पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळते, असंही ते म्हणाले होते.

डोस घेतल्यावरही सतर्क राहा

व्हॅक्सिनची गरज आहे. मात्र, लसीचा डोस मिळाल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याच्या केसेस दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. व्हॅक्सिनेशननंतरही कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजे. व्हेरिएंटच्या डबल म्युटेटंला न्यूट्रलाईज करण्यात आलं आहे. तरीही व्हेरिएंट व्हॅक्सिनेशनच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, असं ते म्हणाले. कोणती व्हॅक्सिन प्रभावी आहे आणि कोणती नाही हे आताच सांगू शकत नाही. सीडीसी आणि एनआयएचच्या डेटानुसार जी व्हॅक्सिन उपलब्ध आहे, ती घेतली पाहिजे, असं आवाहन जाधव यांनी केलं होतं. (Serum Institute Distanced Itself From Its Executive Director Statement)

 

संबंधित बातम्या:

‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’; राहुल गांधींच ट्विटर ‘वॉर’ सुरूच

स्टॉक नसतानाही लसीकरणास सुरुवात; ‘सीरम’ची केंद्र सरकारवर टीका

येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका, मोदी सिस्टिमला झोपेतून जागं व्हावं लागेल: राहुल गांधी

(Serum Institute Distanced Itself From Its Executive Director Statement)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI