एण्डोस्कोपी म्हणजे काय? ती वेदनादायी असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?

| Updated on: Mar 29, 2021 | 11:40 AM

एण्डोस्कोपी म्हणजे पोटावर लहानसे छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकण्याची प्रक्रिया. (Sharad Pawar What is Endoscopy)

एण्डोस्कोपी म्हणजे काय? ती वेदनादायी असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?
शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar Symptomatic Gallstones) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात झालं असून त्यांच्यावर एण्डोस्कोपी (endoscopy) केली जाणार आहे. एण्डोस्कोपी म्हणजे नेमकं काय, ती वेदनादायी असते का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. (Sharad Pawar health update NCP chief hospitalized in Mumbai Know What is Endoscopy)

एण्डोस्कोपी म्हणजे काय? (What is endoscopy)

एण्डोस्कोपी म्हणजे पोटावर लहानसे छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकण्याची प्रक्रिया. यावेळी कार्बन डायऑक्साईड (CO2) या वायूने रुग्णाचे पोट फुगवले जाते. एका प्रकाशस्त्रोताने आतले निरीक्षण केले जाते. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास नाभी व्यतिरिक्त दोन-तीन ठिकाणी छ‌िद्र करुन त्यातून उपकरणं पोटात सोडली जातात आणि शस्त्रक्रिया केली जाते.

एण्डोस्कोपी वेदनादायी असते का?

एण्डोस्कोपी पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये दोन ते तीन छिद्रांमधून शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात. पोटावर शस्त्रक्रियेचा डाग राहत नाही. रुग्णाला हॉस्पिटलमध्येही कमी दिवस राहावं लागतं. रुग्ण पूर्ववत आपल्या दैनंदिन कामाला लवकरच सुरुवात करु शकतात.

पवारांविषयी नवाब मलिक यांच्याकडून माहिती

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस

“बाबांना पित्ताशयाचा (Symptomatic Gallstones) त्रास आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला 10 दिवसांसाठी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद” असं व्हॉट्सअॅप स्टेटस पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवलं आहे.

संबंधित बातम्या :

Sharad Pawar health update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात, 31 मार्चला शस्त्रक्रिया

Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?

Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?

(Sharad Pawar health update NCP chief hospitalized in Mumbai Know What is Endoscopy)