Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?

Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?
शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रविवारी सांयकाळी पोटात दुखू लागल्यानं करण्यात आलं होतं. (Sharad Pawar Health News )

Yuvraj Jadhav

|

Mar 29, 2021 | 11:31 AM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रविवारी सांयकाळी पोटात दुखू लागल्यानं अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचं निदान झालं आहे. शरद पवार यांच्यावर 31 मार्चला एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (Sharad Pawar has a problem in his Gall Bladder diagnosed after check up in Breach Candy Hospital tweet by NCP Nawab Malik)

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

आमचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं.

शरद पवारांना हा त्रास झाल्यामुळे त्यांना देण्यात येत असलेली रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना 31 मार्च 2021 रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यामुळे पुढील नोटीसपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

नवाब मलिक यांचं ट्विट

सुप्रिया सुळे यांचं व्हाटसअप स्टेटस

बाबांना पित्ताशयाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याकडे तातडीने लक्ष देऊन उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांना बुधवार 31 मार्चला 10 दिवसांसाठी रुग्णालयात ॲडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेतील. त्यामुळे त्यांचे आजपासून सुरु होणारे नियोजित कार्यक्रम आणि दौरे पुढील 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद

Supriya Sule Status About Sharad Pawar Health

शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सुप्रिया सुळे यांचं स्टेटस

एन्डोस्कोपी म्हणजे काय?

एन्डोस्कोपी ही अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये पोटावर एक छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एन्डोस्कोपी) आत टाकली जाते. कार्बन डाय ऑक्साईड (सीओ2) या वायूने पोट फुगवलं जातं आणि एका प्रकाशस्त्रोताने पोटाच्या आतील निरीक्षण केलं जातं. त्याबरोबर जर काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर नाभी व्यतिरिक्त २-३ छ‌िद्र करुन त्यातून उपकरणं आत (पोटात) टाकून शस्त्रक्रिया केली जाते.

संबंधित बातम्या: 

पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

LIVE | पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

(Sharad Pawar has a problem in his Gall Bladder diagnosed after check up in Breach Candy Hospital tweet by NCP Nawab Malik)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें