LIVE | पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला अजित पवारांची भेट, जळालेल्या दुकानांची पाहणी

| Updated on: Mar 30, 2021 | 12:14 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला अजित पवारांची भेट, जळालेल्या दुकानांची पाहणी
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2021 07:36 PM (IST)

    पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटला अजित पवारांची भेट, जळालेल्या दुकानांची पाहणी

    – पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट या घटनास्थळाला पालकमंत्री अजितब पवार यांची भेट

    – शुक्रवारी फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीत जळून खाक झालेल्या दुकानांची पाहणी

    – या घटनास्थळाची आज अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली

    – यावेळी घटनास्थळाची पाहणी करून लागणारी आर्थिक आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

    व्यापाऱ्यांना मदत करण्याची अजित पवार यांची हमी

  • 29 Mar 2021 06:28 PM (IST)

    कोयनानगरमध्ये शासकीय निवासस्थानात जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या 

    कराड : कोयनानगर येथे शासकीय निवासस्थानात जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

    बंडू कुंभार असे आत्महत्या केलेला कर्मचाऱ्याचे नाव

    बंडू कुंभार हे कोयनानगर जलसंपदा विभागातील कर्मचारी

    राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

    कोयनानगर पोलिसांत गुन्हा दाखल

    कोयनानगर पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरु

  • 29 Mar 2021 06:00 PM (IST)

    अभ्यासाला गेलेली मुलगी शेततळ्यात पडली, वाचवताना बापाचाही मृत्यू

    शेततळ्यात बुडून बाप आणि लेकीचा दुर्दैवी अंत, अकोले तालुक्यातील विरगावमधील घटना, अभ्यासासाठी गेलेली मुलगी पाय घसरून शेततळ्यात पडली होती, मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही मृत्यू, अश्विनी थोरात आणि कृष्णागर थोरात अशी मृत झालेल्यांची नावे, दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली घटना, धुळवडीच्या दिवशी घटना घडल्यानं गावात पसरली शोककळा

  • 29 Mar 2021 05:51 PM (IST)

    नागपूरमध्ये बोरगाव परिसरात जिनिंग कंपनीला भीषण आग, जीवितहानी नाही

    नागपूर : जिल्ह्यातील बोरगाव परिसरात असलेल्या जिनिंग कंपनीला लागली आग

    युनिक ट्रेडिंग कंपनी या जिनिंगला लागली आग

    4 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू

    आग आटोक्यात मात्र कापूस असल्याने निघत आहे धुर

    आगीचं कारण अजून स्पष्ट नाही

    होळीची सुट्टी असल्यामुळे कुठलीही जीवितहानी नाही

  • 29 Mar 2021 04:50 PM (IST)

    कर्जत-नेरळ रोडवर भीषण अपघात, स्फोट होऊन 4 जणांचा मृत्यू

    रायगड : मडिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत अचानक स्फोट होऊन एकूण 4 जण जागीच ठार

    ठार झालेल्यांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एक मुलगा असल्याची माहीती

    ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, आगोदरच रिक्षा आणि कारच्या धडकेनतंर स्फोट होऊन दोन्ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाले  होते.

    रिक्षा किंवा कारमधील एक वाहन CNG वर चालणारे असल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त होतोय.

  • 29 Mar 2021 03:57 PM (IST)

    आता समजलं मिठी नदी साफ का होत नव्हती, डीव्हीआर सापडल्यानंतर भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

    - मिठी नदीत एनआयएला लॅपटाॅप डीव्हीआर सापडल्यानंतर भाजप नेते आक्रमक

    -  मिठी नदी इतक्या दिवस साफ का होत नव्हती हे आत्ता समजलं, अशी टीका

    प्रसाद लाड यांची शिवसेनेवर खोचक टीका

    - मिठी नदीत वाझेंनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर सेनेचं पाप जनतेसमोर ऊघड- प्रसाद लाड

    - सेनेनं आपलं पाप ऊघड होईल म्हणून मिठी नदी साफ केली नाही- प्रसाद लाड

    - आता तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी माफी मागावी, प्रसाद लाड यांची मागणी

  • 29 Mar 2021 03:53 PM (IST)

    सांगलीत वाढती कोरोना परिस्थिती हाताळण्यास महापालिका यंत्रणा सज्ज

    सांगली : 50 महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना परिस्थिती हाताळण्यास महापालिका यंत्रणा सज्ज,

    100 बेडचे कोविड सेंटर कार्यान्वित

    तर होम आयसोलेशनचा नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करणार, मनपा आयुक्तांचा इशारा

  • 29 Mar 2021 03:52 PM (IST)

    पुण्यात मॉलच्या पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर, मॉल खाली केल्याने धोका टळला

    पुणे -

    मॉलच्या पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर,.

    केमीकल पावडरमुळे गँस निर्माण झाला असण्याची शक्यता,

    सध्या पार्किंगमधील पावडर पूर्ण बाहेर काढून, परिस्थितीवर मिळवलं नियंत्रण,

    मॉलमध्ये पावडर कुठून आली याचा केला जाणार तपास....

    एनसीएलचे अधिकारी करणार पावडरची तपासणी,

    मॉल खाली केल्यानं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण आणल्यानं धोका टळला....

  • 29 Mar 2021 01:48 PM (IST)

    मुरबाड SBI बँकेच्या एटीएममधून 46 लाख 98 हजार 200 रुपये अचानक गायब

    मुरबाड SBI बँकेच्या एटीएममधून सुमारे 46 लाख 98 हजार 200 रुपये अचानक गायब

    या गुन्ह्यात मुरबाड पोलिसांनी 2 आरोपींना 24 तासाच्या आत पकडले आहे

    कल्याण तालुक्यातील वरप येथील दरोडा प्रकरणात आरोपी ताब्यात घेतले आहेत

    त्या संदर्भात मुरबाड पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये 4 वाजता पत्रकार परिषद ठेवली आहे

    या पत्रकार परिषदेला ठाणे SP उपस्थित राहणार आहे

  • 29 Mar 2021 12:16 PM (IST)

    धुळवडसाठी नागरिक रस्त्यावर येऊ नये आणि नियमात राहून होळी साजरी करावी यासाठी पोलीस रस्त्यावर

    नागपूर -

    धुळवडसाठी नागरिक रस्त्यावर येऊ नये आणि नियमात राहून होळी साजरी करावी यासाठी पोलीस रस्त्यावर

    पोलिसांनी चौका चौकात केली नाका बंदी

    बाहेर निघणाऱ्यांची केली जात आहे चेकिंग

    मात्र सध्या तरी रस्त्यावर गर्दी फार कमी असल्याचं चित्र

  • 29 Mar 2021 12:10 PM (IST)

    नागपूरच्या दोसर भवन चौकतील दुकानाला आग

    नागपूर -

    नागपूरच्या दोसर भवन चौकतील दुकानाला लागली आग

    ऑटो मोबाईल स्पेअर पार्ट, ,कुशन, गॅरेज , च्या दुकानाला लागली आग

    4 दुकान आग लागली,

    आगेचे कारण स्पष्ट नाही

    अग्निशमन विभागाने आग विझविण्यात मिळवलं यश

  • 29 Mar 2021 12:09 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणावी यासाठी कोल्हापूरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन आक्रमक

    कोल्हापूर :

    छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणावी यासाठी कोल्हापूरातील शिवदुर्ग संवर्धन आंदोलन आक्रमक

    शिवदुर्ग संवर्धन च्या कार्यकर्त्यांचा पन्हाळ गडावरील सज्जाकोठीवर ठिय्या

    लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही,आंदोलकांचा इशारा

    शिवदुर्ग संवर्धन कडून गेल्या काही दिवसापासून सुरू आहे जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठीची मोहीम

  • 29 Mar 2021 11:45 AM (IST)

    लॉकडाऊन हा पर्याय नाही, सरकारने कोरोना चाचण्या वाढवल्या पाहिजेत : चंद्रकांत पाटील 

    मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये जावं, मातोश्रीत राहून काहीही होणार नाही. लॉकडाऊन हा पर्याय नाही. सरकारने कोरोना चाचण्या वाढवल्या पाहिजेत. - चंद्रकांत पाटील

  • 29 Mar 2021 11:20 AM (IST)

    सलग सुट्या असूनही अंबाबाई मंदिराची दर्शन रांग भक्ताविना ओस

    कोल्हापूर :  सलग सुट्या असूनही अंबाबाई मंदिराची दर्शन रांग भक्ताविना ओस

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची भाविकांना धास्ती

    मंदिर आवारात स्थानिक भविकांचीच तुरळक गर्दी

    रात्रीची संचारबंदी, कोरोना निर्बंधामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट

  • 29 Mar 2021 10:51 AM (IST)

    पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

    पोटात दुखू लागल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नवाब मलिकांकडून ट्वीट करत माहिती

  • 29 Mar 2021 10:18 AM (IST)

    कामानिमित्त भेटल्यास चुकीचं काय? अमित शाह- शरद पवारांंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

    कामानिमित्त भेटल्यास चुकीचं काय? अमित शाह- शरद पवारांंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, विरोधक हे बेरंग आहे. बंद दाराआड बोललेल्या गोष्टी बाहेर येतात : संजय राऊत

  • 29 Mar 2021 09:30 AM (IST)

    नंदुरबारमध्ये चोरी, इतर कारणांनी जप्त करण्यात आलेल्या 43 मोटरसायकल धुळखात

    नंदूरबार -

    चोरीच्या तसेच इतर विविध कारणांनी जप्त करण्यात आलेल्या तब्बल 43 मोटरसायकल उपनगर पोलीस स्टेशन धूळखात

    विशेष म्हणजे संबंधित मालकांना मोटरसायकलच घेऊन जाण्यास सांगून ते आले नसल्याने आता एप्रिल महिन्यात या दुचाकींचे विल्हेवाट लावण्यात येणार आहे

  • 29 Mar 2021 08:27 AM (IST)

    धुलिवंदनच्या निमित्ताने नागपुरातील चिकन मटणच्या दुकानात गर्दी

    नागपूर -

    धुलिवंदनच्या निमित्ताने चिकन मटणच्या दुकानात गर्दी

    सकाळ पासून नागरिक पोहचले चिकन मटण च्या दुकानात

    दुकानदारांनी केलं नियोजन नंबर प्रमाणे ग्राहकांना दिला जातो दुकानात प्रवेश

    आज एक वाजता पर्यंत च दुकान सुरू असल्याने नागरिकांनी सकाळीच लावले नंबर

    सोशल डिस्टनसिंग पाळत केली जात आहे विक्री

    चिकन मटण ची झाली भाववाढ

  • 29 Mar 2021 08:26 AM (IST)

    नालासोपाऱ्यात महिलेची हत्या करुन बॅगेत भरलेला मृतदेह सापडला

    नालासोपारा :

    नालासोपारा पूर्वेला रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास महिलेची हत्या करून बॅगेत भरलेला मृतदेह सापडला आहे

    नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर या परिसरात मुख्य रस्त्याजवळ एका काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह सापडला आहे

    तुळिंज पोलिसांनी घटनास्थली पोहचून, पंचनामा केला आहे. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

    या महिलेची ओळख अजून पटलेली नाही.

    ही महिला कोण आहे..? कुठून आली..?? तिला ठार कुणी मारलं..?? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

    मात्र या घटनेन परिसरात खळबळ माजली आहे.

  • 29 Mar 2021 08:17 AM (IST)

    येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा पुणे महाविद्यालयांचा निर्णय

    पुणे -

    येत्या शैक्षणिक वर्षात शुल्कवाढ न करण्याचा महाविद्यालयांचा निर्णय

    राज्यातील 1 हजार 24 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी घेतला निर्णय

    शुल्क नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आली माहिती

    शुल्कवाढ न करणाऱ्या महाविद्यालयांची संख्या पॉलिटेक्‍निक : 199 पदविका फार्मसी : 153 एमबीए : 99 अभियांत्रिकी : 87 आर्किटेक्‍चर : 26

  • 29 Mar 2021 08:14 AM (IST)

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद 

    नाशिक -

    - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद

    - 29 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद

    - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात मंदिर प्रशासनाचा निर्णय

    - या काळात निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा आणि नैमित्तिक पूजा सुरु राहणार..

  • 29 Mar 2021 07:12 AM (IST)

    धुळवडच्या निमित्ताने नागपूर शहरात असणार कडेकोट बंदोबस्त

    नागपूर  -

    धुळवडच्या निमित्ताने शहरात असणार कडेकोट बंदोबस्त

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धुळवड साजरी करण्यास मनाई आहे

    रस्त्यावर कोणी रंग खेळताना दिसल्यास त्याच्या वर होणार कडक कारवाई

    प्रशासनाने काढले आहे जमावबंदीचे आदेश

    नागपुरात वाढत असलेल्या कोरोना ची रुग्ण संख्या बघता असणार कडक बंदोबस्त

  • 29 Mar 2021 06:43 AM (IST)

    अंबरनाथच्या कोहोजगाव भागात दुकानाला आग

    अंबरनाथच्या कोहोजगाव भागात  एका मिठाईच्या दुकानाला लागली आग

    एकाच दुकानाला तीन महिन्यात दुसऱ्यांदा आग

    नाईट कर्फ्युच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला

    अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या मेहनतीने ही आग विझवली

  • 29 Mar 2021 06:39 AM (IST)

    डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा मुलगा गंभीर जखमी

    पिंपरी चिंचवड -

    - डोक्यात बंदुकीची गोळी लागल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेविकेचा मुलगा गंभीर जखमी

    - रात्री सव्वा नऊच्या सुमारासची घटना

    - चिंचवडमधील राहत्या घरात घडला असून प्रसन्न चिंचवडे असं 21 वर्षीय मुलाचे नाव. तो करुणा चिंचवडे या नगरसेविकेचा मुलगा आहे.

    - घरात सगळे उपस्थित असताना वडिल शेखर चिंचवडे यांची परवानाधारक बंदूक घेऊन तो वरच्या खोलीत होता

    - तेंव्हा अचानक बंदुकीचा आवाज आला. वर जाऊन पाहिलं असता, प्रसन्न जखमी अवस्थेत होता.प्रसन्न चिंचवडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु,गोळी नेमकी कशी लागली याबाबत चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

  • 29 Mar 2021 06:37 AM (IST)

    नेरुळच्या कुकशेत गावात "एक गाव  एक होळी" साजरी

    नवी मुंबई नेरुळ येथील कुकशेत गावात "एक गाव एक होळी" प्रथा - परंपरा जपत होळीची पूजा करण्यात आली, कोरोना नियमांचं पालन करून कुकशेत ग्रामस्थांनी आगरी कोळी पारंपरिक पद्धतीने होळीची विधीवत पूजा केली, गावाकडे पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या विशेष लक्ष होतं, याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या

Published On - Mar 29,2021 7:39 PM

Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.