अभिनेता हर्षवर्धन राणे याने मुंबईत कोट्यवधीचे दोन फ्लॅट खरेदी केले, किंमत किती ?
'सनम तेरी कसम' फेम अभिनेता हर्षवर्धन राणे याने मुंबईत एक आलिशान घर खरेदी केली आहे. याआधी त्याचे मड आयलँड येथे दोन फ्लॅट आहेत.

Harshvardhan Rane New Home: अभिनेता हर्षवर्धन राण साल 2016 चा चित्रपट ‘सनम तेरी कसम’ नंतर प्रसिद्धीला आला. आज त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत.एकीकडे हर्षवर्धन राणे त्याच्या करियरकडे लक्ष देत असताना आता त्याने मुंबईत एक नवीन घर खरेदी केले असून ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
अभिनेता हर्षवर्धन राणे याने आपल्या करियरमध्ये केवळ ओळख मिळविली नाही तर पैसाही कमावला आहे.आता त्याने मुंबईत एक आलिशान घर विकत घेतले असून त्याची किंमत 15-16 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. हर्षवर्धन याने पहिल्यांदाच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली नाही. आधीच त्याचे मुंबईत दोन फ्लॅट असून जे मड आयलँड येथे आहे. रिपोर्टनुसार मड आयलँडच्या त्या दोन्ही फ्लॅट्ची किंमत मिळून 10-12 कोटी रुपये म्हटली जात आहे. आता हर्षवर्धन याने आणखी एक मोठी डील केली आहे.
हर्षवर्धन राणे याचे प्रोफेशनल लाइफ
हर्षवर्धन राणे याच्या करियरचा विचार करता त्याने साल 2010 मध्ये तेलगु चित्रपट ‘थकिता थकिता’ मधून चित्रपट जगात प्रवेश केला होता. त्याआधी त्याने टीव्हीमध्ये देखील काम केले होते. साल 2016 मध्ये ‘सनम तेरी कसम’ मधून त्याने त्याच्या बॉलीवूडचा प्रवास सुरु केला होता. मात्र, हा चित्रपट फ्लॉप गेला. मात्र, जेव्हा हा चित्रपट पुन्हा रिलिज झाला तेव्हा याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि हर्षवर्धन राणे याचे काम चमकले.
हर्षवर्धन राणे याचे अपकमिंग चित्रपट
हर्षवर्धन राणे याच्या येणाऱ्या चित्रपटाचा विचार करायचा झाला तर तो अभिनेता जॉन अब्राहम सोबत ‘फोर्स 3’ मध्ये काम करत असून हा चित्रपट 19 मार्च 2027 रोजी रिलीज होत आहे. याशिवाय तो राम गोपाल वर्मा याचा चित्रपट ‘पुलिस कंपनी’ मध्ये ही तो दिसणार आहे. हा चित्रपट 4 जून 2027 रोजी रिलीज होणार आहे.
हर्षवर्धन राणे अलिकडे ‘एक दीवाने की दीवानियत’ नावाच्या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील त्याच्या कामाची तारीफ झाली.वर्ल्डवाइड या चित्रपटाने 112 कोटीची कमाई केली होती.
