AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या आठवड्यात आमची…विलीनीकरणावर बोलताना पवारांच्या बड्या नेत्याचं मोठं विधान; दिली मोठी माहिती!

एकत्र येण्याचं ठरलं होतं म्हणूनच गेल्या काही निवडणुका आम्ही एकत्र लढलो. दुर्दैवाने दादांचा अपघात झाला, खूप दुःख झालं आजही दादांची पावलोपावली आठवण येते, असं या बड्या नेत्याने सांगितलं

पुढच्या आठवड्यात आमची...विलीनीकरणावर बोलताना पवारांच्या बड्या नेत्याचं मोठं विधान; दिली मोठी माहिती!
sunetra pawar and sharad pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 7:46 PM
Share

रवींद्र देसाई, टीव्ही 9 मराठी, पुणे : सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झालीय. भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. लवकरच विलीनीकरणाचा निर्णय होऊ शकतो, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे दिवंगत नेते अजित पवार हयात असताना विलीनीकरणावर बैठका झाल्या होत्या, असं आता उघडपणे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांकडून सांगितलं जातंय. असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठा खुलासा केलाय.

एकत्र येण्याचं ठरलं होतं म्हणूनच….

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या बैठकीला मी होतो. त्यावेळी अजितदादांची एकत्र येण्याबाबतची भूमिका होती. याबाबत अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यावेळी एकत्र यायचं ठरलं होतं ही वस्तुस्थिती आहे, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. एकत्र येण्याचं ठरलं होतं म्हणूनच गेल्या काही निवडणुका आम्ही एकत्र लढलो. दुर्दैवाने दादांचा अपघात झाला, खूप दुःख झालं आजही दादांची पावलोपावली आठवण येते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

अजितदादा यांच्यानंतरची परिस्थिती बदलली आहे. आता आमची अशात बैठक झालेली नाही. मी कोअर कमिटीचा मेंबर आहे. मधल्या काळात शरद पवार साहेब रुग्णालयात होते. त्यामुळे चर्चा झाली नाही. पण आता जर बैठक बोलावली तर आम्ही जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

विलीनीकरणाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष घेतील

विलीनीकरणाच्या बाबतीत जरी आम्ही पक्षातील ज्येष्ठ मंडळी असलो तरी विलीनीकरणाचा निर्णय पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष घेत असतात. आमचा पक्ष असो किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष असो, याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्षच घेतील. आमच्या पक्षात तरी अशी पद्धत आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुढील आठवड्यात

पक्षांमध्ये वैयक्तिक मताला फारसं महत्त्व नसतं. पक्षामध्ये सांघिक मताला महत्त्व असतं. कारण पक्ष टीमवर्कवर चालत असतो. कोअर कमिटीची मीटिंग होईल तेवढे आम्ही भूमिका समजून घेऊ. आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पुढील आठवड्यात होईल. त्यावेळी चर्चा होईल असं वाटतंय, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व