Chanakya Niti : तारुण्यात या चार गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. तारुण्यात माणसाने काय करावं आणि काय करु नये? याबाबत देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. तारुण्यात माणसाने कसं जगावं? काय करावं आणि काय करु नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाला मिळालेलं तारुण्य ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. तुम्ही तुमच्या तारुण्यात तुम्हाला हवी ती गोष्ट करू शकतात. जिथे लाथ माराल तिथून पाणी काढण्याची हिंमत तारुण्यात तुमच्याकडे असते. तारुण्यात माणसाकडे पैसा, शक्ती, सत्ता अशा सर्वच गोष्टी असतात. त्यामुळे तारुण्य हे जरी माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी जर त्याचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही तर ते तुमच्यासठी श्राप देखील ठरू शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नेहमी चार गोष्टी या लक्षात ठेवाव्यात असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.
पैसा – चाणक्य म्हणतात तारुण्यात तुम्ही प्रचंड पैसा कमावतात, परंतु या पैशांचं योग्य व्यवस्थापन तुम्हाला जमलं पाहिजे, म्हणजे कुठे किती पैसा खर्च करायचा? कुठे बचत करायची? हे गणित ज्याला जमतं तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
ताकद – चाणक्य म्हणतात तरूणपणात माणसाच्या अंगात ताकद खूप असते, प्रचंड ऊर्जा असते. परंतु या ऊर्जेचा वापर हा कधीही एखाद्या व्यक्तीवर अन्याय करण्यासाठी होऊ देऊ नका, तर त्या ऊर्जेचा वापर दुर्बलांचं संरक्षण करण्यासाठी करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
घाईत निर्णय घेणं टाळा – चाणक्य म्हणतात तरूणपणात अनेकदा आपण बरेच निर्णय हे खूप घाईने घेतो. त्याचे परिणाम भविष्यात काय होतील याचा आपण कधीही विचार करत नाहीत, मात्र यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे कोणतेही निर्णय हे घाईत घेणं टाळा.
नाते जपा – चाणक्य म्हणतात तारुण्यात प्रत्येकाची भावना हीच असते की आपल्याला कोणाची गरज नाही, परंतु वस्तुस्थिती ही असते की तुम्हाला भविष्यात प्रत्येकाची गरज लागणार असतेच, त्यामुळे तारुण्यात नाते जपा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
