AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनेकांना अर्थ कळत नाही, तरीही हे गाणं 16 वर्षांपासून जगभरात लोकप्रिय, संगीत ऐकूनच गुणगुणतात लोक

16 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याने जगभरातील चाहत्यांच्या मनावर केलं राज्य. लिरिक्स नसताना देखील मिलेनियल्स आणि Gen Z प्रचंड आवडीने ऐकतात हे गाणं. यूट्यूबवर मिळाले 3.7 अब्जांहून अधिक व्ह्यूज.

अनेकांना अर्थ कळत नाही, तरीही हे गाणं 16 वर्षांपासून जगभरात लोकप्रिय, संगीत ऐकूनच गुणगुणतात लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 12, 2026 | 7:21 PM
Share

सध्या जगभरात दररोज हजारो नवीन गाणी रिलीज होतात. मात्र, काही गाणी अशी असतात, जी अनेक वर्षांनंतरही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. असंच एक गाणं म्हणजे प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर याचं ‘Baby’. तब्बल 16 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिलं आणि ऐकलं जात आहे. विशेष म्हणजे, भारतातील मिलेनियल्सपासून ते Gen Z पर्यंत अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आजही या गाण्याचा समावेश आहे.

जस्टिन बीबरचं ‘Baby’ हे गाणं 18 जानेवारी 2010 रोजी रिलीज झालं होतं. त्याच्या ‘My World 2.0’ या पहिल्या स्टुडिओ अल्बममधील हे प्रमुख सिंगल होतं. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच या गाण्याने अमेरिका, कॅनडा, ब्रिटन यांसह अनेक देशांमध्ये लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे, 2010 च्या दशकाच्या सुरुवातीला हे गाणं तरुणाईमध्ये एक मोठा ट्रेंड बनलं होतं.

यूट्यूबवर मिळाले 3.7 अब्जांहून अधिक व्ह्यूज

या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज त्याच्या यूट्यूब व्ह्यूजवरून लावता येतो. ‘Baby’ या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 3.7 अब्जांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याच्या रिलीजला अनेक वर्षे उलटली असली, तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही या गाण्यातील ‘Baby, Baby, Baby, Oh!’ ही ओळ अनेक चाहत्यांच्या लक्षात आहे.

लुडाक्रिसनेही केली होती खास कामगिरी

या गाण्यात जस्टिन बीबरसोबत अमेरिकन रॅपर लुडाक्रिस देखील झळकला होता. त्याने गाण्यात रॅप केला आहे. या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन रे के यांनी केले होते. व्हिडीओमध्ये किशोरवयीन प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यामध्ये जस्टिन बीबर जस्मिन विलेगास या मुलीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

सर्वाधिक डिसलाइक्स मिळूनही लोकप्रियता कायम

विशेष म्हणजे, एकेकाळी ‘Baby’ हे गाणं यूट्यूबवरील सर्वाधिक डिसलाइक्स मिळालेल्या व्हिडीओंपैकी एक होतं. मात्र, याचा गाण्याच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाला नाही. उलट आजही हे गाणं जगभरातील चाहत्यांकडून आवडीने ऐकलं जातं. या एका गाण्यामुळे जस्टिन बीबरला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली आणि तो पॉप संगीतविश्वातील लोकप्रिय गायकांपैकी एक बनला.

Follow Us
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना आक्रमक, राजकीय वाद पेटला!
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!