Surya Gochar: 16 नोव्हेंबरला सूर्य करणार राशी परिवर्तन! या 4 राशींच्या प्रगतीचे नवे मार्ग खुलणार
Sun Transit: 16 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव 4 राशींवर पाहायला मिळेल. या काळात या राशींच्या करिअर आणि आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी नवे मार्ग खुलणार असून, काही चांगल्या संधी मिळू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर होत असतो. येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सूर्य तुला राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याला आत्मविश्वास, मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे सूर्याच्या या गोचराचा परिणाम नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, या राशी परिवर्तनाचा विशेष फायदा ४ राशींना मिळण्याची शक्यता आहे. काहींना नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तर काहींच्या व्यवसायात आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील. चला तर मग, जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
कधी होणार सूर्य गोचर? पंचांगानुसार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या राशीत सूर्य १६ डिसेंबरपर्यंत राहणार असून, त्यानंतर धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी ४ राशींसाठी हा काळ विशेष ठरू शकतो.
मिथुन नोकरीच्या ठिकाणी दीर्घकाळापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी नवीन डील मिळण्याची संधी आहे. आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
कन्या कुटुंबातील सुरू असलेल्या समस्या कमी होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक बाबतीतही परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते.
मकर उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.
कुंभ कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारू शकतात. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क निर्माण होईल, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. दीर्घकाळापासून एखाद्या चांगल्या संधीची वाट पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत आहेत.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
