बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही, अजित पवार अपघातावर काय म्हणाले मंत्री भरत गोगावले?
आम्हाला काही असे वाटत नाही, पण राजकारणात कधीही काही घडू शकते. सकाळचा, दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे ? राजकारणात काही घडेल हे सांगू शकत नाही असेही एका प्रश्नावर मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की मारणाऱ्यांची काठी धरू शकतो, पण बोलणाऱ्याचे तोंड धरु शकत नाही. अजित पवार यांच्या अपघाताबद्दल वस्तू स्थिती समोर आल्याशिवाय काही बोलू शकत नाही. अपघाताच्या आधी काही बैठका झाल्याने संशय व्यक्त होतो. परंतू आजच्या काळात एखादा पायलट स्वत:चा जीव कशा देईल असा सवाल करुन जोपर्यंत तथ्य समोर येत नाही तोपर्यंत अशा चर्चांना काही अर्थ नसल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांनी दोन्ही राष्ट्रवादीचा फुटून नवा गट अस्तित्वात येईल असे म्हटले आहे. यावर विचारले असताना भरत गोगावले यांनी संजय शिरसाठ संभाजीनगरचा त्याला कदाचित पश्चिम महाराष्ट्र विदर्भ- मराठवाडा जवळ असल्यामुळे काही माहिती कळाली असेल तर पुढच्या कॅबिनेटला मी या संदर्भात त्याला विचारतो असेही मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम आरोप करत आहेत. या संदर्भात विचारले असता मंत्री भरत गोगावले म्हणाले गेल्या निवडणूकांच्या वेळी तिकीट डिक्लरेशन होण्याआधी कदम यांनी सुनील तटकरे यांचे तिकीट डिक्लेअरल केले होते. त्यामुळे ते दोघे एकमेकांना चांगले ओळखत असतील. ते आमचे सिनियर आहेत, त्यामुळे आम्हाला काही बंधने आहेत. आम्ही जास्त खोलात जात नाही. आमच्या वरिष्ठांची उच्च पातळीवर चर्चा चालू आहे, काही ना काही तोडगा निघेल.प्रामाणिक पणे आम्ही काम करतोय. काही गोष्टी अरेला कारे होतात. परंतू शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले आहे. आम्हाला युती धर्म टिकवायचा आहे. आमच्याच जो तात्विक वाद आहे,त्यावर आमचे वरिष्ठ बोलतील असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
राजकारणात काही घडेल हे सांगू शकत नाही
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. त्या संदर्भात विचारले असता मंत्री भरत गोगावले म्हणाले की गुलाबराव पाटील गुलाबासारखे आहेत. त्यांनी जे काही सांगितलं आहे. ते आता नजिकच्या भविष्यात तरी दिसत नाही.आम्हाला काही असे वाटत नाही, पण राजकारणात कधीही काही घडू शकते. सकाळचा, दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे ? राजकारणात काही घडेल हे सांगू शकत नाही. गुलाबरावांना याची कशी काय भणक लागली ? असेल ते देखील आम्ही मंगळवारी कॅबिनेट मिटींगला त्यांना विचारु असेही ते म्हणाले.
