Heavy Rain Alert : वारं फिरलं, आता थेट 10 दिवस तडाखेबाज पाऊस, 184 KM ताशी… ‘टॉमस’ने चिंता वाढली
Tomas typhoon warning : बंगालच्या उपसागरात 13 नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने काही भागांत पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पण आता आणखी एक चक्रीवादळ तयार होत असून त्यामुळे तब्बल 10 दिवस सलग सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होणार आहे.

यंदा काही पाहीजे तसा पाऊस देशामध्ये झालेला नाही. आता हे वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. परंतु हवामानाने केलेला लपंडाव काही थांबायचं नाव घेत नाही. आता आणखी एक मोठं संकट येण्याची चिन्हे आहेत. आता तब्बल दहा दिवस पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामानातील बदल नेमका का होतो आहे. यामागचं कारण काय याबद्दल जाणून घेऊयात.
हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आता २०२६ हे वर्ष संपण्यापूर्वी एक टॉमस नावाचं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. जसा वेळा सरेल तसं हे वादळ आणखी आक्रमक होत जाईल आणि त्यानुसार जर ही सर्व वातावरणातली साखली ताकदीने तयार झाली तर मग वाऱ्याचा वेग हा ताशी १८४ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे लगातार सुमारे १० दिवस समुद्र आणि मानवी वस्ती असलेल्या जमिनींवरही मुसळधार पाऊस पडू शकतो. हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावेल, त्यामुळे बरंच नुकसानही होऊ शकतं.
टॉमसमुळे कुठे आहे सर्वात मोठा धोका?
समुद्रातील या संभाव्य वादळामुळे आणि पॅसिफिक महासागराच्या आसपासच्या किनारपट्टीला थेट धोका निर्माण होऊ शकतो. फिलिपिन्सची हवामान संस्था PAGASA ने यासंदर्भी इशारा दिला आहे.
डिसेंबर अखेरीस येऊ घातलेल्या या चक्रीवादळाचं नाव संस्थेने आधीच निश्चित केलं आहे. त्यामुळे या प्रदेशातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः उत्तर लुझोन आणि पूर्व किनारपट्टीतील बेटांना या वादळाचा तडाखा बसू शकतो.
किती काळ टिकेल टॉमसचा प्रभाव?
दरम्यान, सर्वात मोठा प्रश्न असा आहे कीस हे वादळ मानवी वस्तीत कधी धडकेल आणि त्यामुळे किती विध्वंसाची शक्यता आहे. तर याचं उत्तर असं आहे की, निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. पण डिंसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची वेळ निश्चित मानली जात आहे. चक्रीवादळाचे आयुष्य हे त्याच्या वेगावर अवलंबून असते. अशी वादळं तयार होतात तेव्हा कमीत कमी ५-१० दिवस त्यांना कमकुवत होण्यासाठी लागतात.
शास्त्रंज्ञांनी सांगितले की, जर टॉमस चक्रीवादळ निरीक्षण क्षेत्रात प्रवेश करून जमिनीकडे वळले, तर त्याचा किनारपट्टीच्या भागांवर थेट परिणाम १ ते ४ दिवस टिकू शकतो. जर ते किनारपट्टीवर धडकले, तर सोसाट्याच्या वाऱ्यांचा आणि मुसळधार पावसाचा सर्वात धोकादायक टप्पा २ ते ३ दिवस टिकू शकतो.
