AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : तुम्ही तर लोकांना…आदिनाथ कोठारेच्या ‘रामायण’ सिनेमावर नितीश भारद्वाज प्रचंड संतापले, काढले वाभाडे

Nitish Bharadwaj On Ramayana : नितीश भारद्वाज यांनी 'रामायण' सिनेमावर पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.

Ramayana : तुम्ही तर लोकांना...आदिनाथ कोठारेच्या 'रामायण' सिनेमावर नितीश भारद्वाज प्रचंड संतापले, काढले वाभाडे
| Updated on: Nov 12, 2026 | 7:21 PM
Share

‘रामायण’ सिनेमातील पात्रांच्या चित्रणावरून आणि हिंदू महाकाव्याच्या अर्थावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातील सीन्स, व्हीएफएक्स आणि अॅक्शन सीक्वेन्सनं लक्ष वेधून घेतलं असलं तरी, त्यातील निर्णयांवरून प्रेक्षकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता, बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील भगवान कृष्णाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे नितीश भारद्वाज यांनी या वादात आपलं मत मांडलं आहे.

चित्रपटाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, नितीश भारद्वाज यांनी सिनेमाला ‘मसाला चित्रपट’ म्हटलं आहे आणि तरुण प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ‘रामायण’च्या अर्थाच्या अनेक पैलूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

‘रामायण’बद्दल काय म्हणाले नितीश भारद्वाज?

बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील भगवान कृष्णाच्या अविस्मरणीय भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी ‘रामायण‘वर आक्षेप घेतला आहे. त्यांनी चित्रपटातील हिंदू पौराणिक कथांच्या चित्रणावर आणि चित्रपट निर्मात्यांनी घेतलेल्या सर्जनशील स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नितीश भारद्वाज म्हणाले की, हा चित्रपट तरुण प्रेक्षकांच्या मनात हिंदू धर्म, त्याचे नायक आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाबद्दल गैरसमज निर्माण करू शकतो.

नितीश भारद्वाज यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, चित्रपटातील सीन्स आणि ऑनलाइन शेअर केले जाणारे व्हिडिओ हे ऐतिहासिक किंवा धार्मिक सत्य आहेत असं मानू नका. तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. पुढे नितीश यांनी तरुणांना महाकाव्य आणि त्याच्या विविध व्याख्या समजून घेण्यासाठी विश्वसनीय साहित्यिक स्रोतांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. ”रामायण’ हा मसाला चित्रपट तरुणांची दिशाभूल करतो. हा सिनेमा तरुण प्रेक्षकांना हिंदू धर्म, त्याचे नायक आणि खलनायक, आणि भारताच्या परंपरांबद्दल चुकीची माहिती देतो. मी तरुणांना आवाहन करतो की, त्यांनी सखोल संशोधन केलेली पुस्तके वाचावीत आणि सोशल मीडियावर किंवा चित्रपटांमध्ये जे दाखवले जातं त्यावर केवळ विश्वास ठेवू नये.’ असं नितीश म्हणाले.

रामायणा सिनेमाच्या लेखनावर बोलताना नितीश म्हणाले की, ‘रामायणाचा एकच लेखक आहे का? चित्रपट असा दावा करतो की, रामायणाचा एकच लेखक नाही. माझ्या मते, वाल्मीकी हे मूळ लेखक आहेत. इतर आवृत्त्या या काल्पनिक आणि भौगोलिक भिन्नता आहेत, ज्या मूळ कथेपेक्षा काही प्रमाणात वेगळ्या आहेत’ अभिनेत्यानं राक्षस आणि असुर संस्कृतींमधील फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, रावण हा ‘राक्षस संस्कृतीचा’ एक प्रमुख प्रतिनिधी होता, त्यानं तिन्ही लोकांमध्ये ‘असुर राजवट’ स्थापन केली नव्हती. त्यांनी लिहिलं, ‘कैकेसी आणि रावण हे राक्षस होते, असुर नव्हते. रावणाला राक्षस संस्कृतीचा एक प्रमुख प्रतिनिधी मानलं जातं, जी संस्कृती भौतिकवाद, वास्तुकला आणि विज्ञानात प्रगत होती, परंतु वैदिक संस्कृतीच्या विरोधात होती. रावणानं तिन्ही लोकांमध्ये असुर राजवट स्थापन केली नाही; लंकेत राक्षस राजवट होती.’

‘रावणाचं वैदिक ज्ञान आणि अश्वमेध घोडा: कैकेसीचे वडील सुमाली राक्षस होते, तर तिचे पती विश्वराव एक ब्राह्मण ऋषी होते. रावणाला वडिलांकडून वैदिक ज्ञान मिळालं, पण माझ्या मते, ‘शिव तांडव स्तोत्रम्’ रचण्याव्यतिरिक्त त्यानं कधीही वैदिक संस्कृतीचं पालन केलं नाही. मग त्यानं चित्रपटात अश्वमेध घोड्याचा वापर कसा केला?’ असंही नितीश भारद्वाज म्हणाले.

Follow Us
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना आक्रमक, राजकीय वाद पेटला!
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!