AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेंटल बायकोनंतर आता गर्लफ्रेंडही भाड्याने; नवी सेवा सुरू, कशी बुक कराल? किती येतो खर्च?

जगात काही ठिकाणी तुम्हाला लग्नासाठी भाड्याने बायको मिळते, अगदी भारतामध्ये देखील एक ते दोन ठिकाणी अशी प्रथा सुरू असल्याचं पहायला मिळतं, मात्र आता तुम्हाला चक्क रेंटने गर्लफ्रेंन्ड सुद्धा मिळणार आहे.

रेंटल बायकोनंतर आता गर्लफ्रेंडही भाड्याने; नवी सेवा सुरू, कशी बुक कराल? किती येतो खर्च?
Rental GirlfriendImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 7:27 PM
Share

आपल्या प्रिय व्यक्तीसोबत जगातील सुंदर सुंदर ठिकाणाला भेट देणे, पर्यटनाचा आनंद घेणे हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचंच लग्न झालेलं असतं, किंवा प्रत्येकालाच गर्लफ्रेंड असते असं नाही. अशा वेळी पार्टनरशिवाय कुठेही बाहेर फिरणं आपल्याला निरस वाटू शकतं. मात्र विचार करा तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे, आणि तिथे जर तुम्हाला रेंटने गर्लफ्रेंड मिळाली तर? जी तुमच्यासोबत वेळ घालवू शकेल. तुमच्यासोबत फिरू शकेल, तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला तिच्यासोबत मनमोकळेपणाने शेअर करता येतील. हे ऐकायला थोडं विचित्र वाटत आहे, मात्र हे खरं आहे. जपानमध्ये आता ही सुविधा सुरू झाली आहे. जपानमध्ये आता अनेक ठिकाणी तुम्हाला रेंटल गर्लफ्रेंड सुविधा मिळत आहे. यामुळे आधी ओळख, नंतर प्रपोज या सर्व गोष्टींची झंझट आता संपली आहे, तुम्ही थेट गर्लफ्रेंडला बुक करू शकता. मात्र यासाठी येणारा सर्व खर्च तुम्हाला करावा लागतो.

जपानमध्ये सध्या हा एक मोठा व्यावसाय झाला आहे. इथे तुम्हाला भाड्याने गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बुक करता येतो. यासाठी काही नियम देखील आहेत, या नियमांचं पालन करून तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता, त्यांना फिरण्यासाठी देखील घेऊन जाऊ शकता. त्यांच्यासोबत आपल्या मनातील गोष्टी देखील शेअर करू शकतात. ही संकल्पा येथील नागरिकांना एवढी आवडली आहे की, अशा प्रकारच्या सुविधा देणाऱ्या कंपन्या देखील आता या ठिकाणी उदयाला आल्या आहेत, तुम्ही या कंपन्यांच्या माध्यमातून गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बुक करू शकता.

किती येतो खर्च?

जर तुम्हाला एखादी गर्लफ्रेंड रेंटने घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रति तास 3000 ते 6000 येन एवढा खर्च येतो, आणि तुम्हाला कमीत कमी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड दोन तासांसाठी बुक करावा लागतो. तशी अटच येथील प्रमुख कंपन्यांची असते, त्यापेक्षा कमी वेळेसाठी तुम्हाला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळू शकत नाही. तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये भावनिक दृष्या गुंतू नये, यासाठी तुम्हाला एकच एक व्यक्ती पु्न्हा पुन्हा बुक देखील करता येत नाही. दरम्यान जगभरात अशी काही ठिकाणी आहे, जिथे लग्नासाठी भाड्याने बायको मिळतो, मात्र आता रेंटने गर्लफ्रेंड देखील मिळत आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना आक्रमक, राजकीय वाद पेटला!
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व