High Heels : महिलांनो हिल्स घालत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी, जाणून घ्या!

Problem With Stilettos : स्त्रिया फॅशनेबल दिसण्यासाठी हिल्सचा वापर करतातच. तसंच भरपूर स्त्रियांची हाईट कमी असते अशा स्त्रियाही हिल्सचा वापर करतात. पण तुम्हाला माहितीये का की या हिल्स घालणं किती हानिकारक आहे.

High Heels : महिलांनो हिल्स घालत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी, जाणून घ्या!
| Updated on: Jun 05, 2023 | 10:24 PM

Health : आजकाल स्त्रिया सुंदर आणि फॅशनेबल दिसण्यासाठी नेहमी काहीना काही नवनवीन ट्राय करत असतात. मग मेकअप, ड्रेस, फुटवेअर अशा प्रत्येक गोष्टीची त्या काळजी घेत असतात. यामध्ये आज आपण हाय हिल्सबाबत जाणून घेणार आहोत. स्त्रिया फॅशनेबल दिसण्यासाठी हिल्सचा वापर करतातच. तसंच भरपूर स्त्रियांची हाईट कमी असते अशा स्त्रियाही हिल्सचा वापर करतात. पण तुम्हाला माहितीये का की या हिल्स तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात. आता ते कसं? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

हिल्स घालण्याचे तोटे

1. पाय दुखणे –  आजकालच्या बहुतेक स्त्रिया पार्टीला जाताना किंवा कुठे बाहेर जाताना हिल्सचा वापर करतातच. पण जास्तवेळ हिल्स घालून उभं राहिल्यामुळे पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. हिल्समुळे पायाच्या स्नायूंवर ताण येतो त्यामुळे पाय दुखतात. त्यामुळे स्त्रियांनी फ्लॅट चप्पल किंवा सँडल्सचा वापर करावा.

2. फ्रॅक्चरचा धोका

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार जास्त वेळ हिल घातली तर कमरेची हाडे कमजोर होतात. तसेच पायाच्या हाडांवरती मोठ्या प्रमाणात प्रेशर पडल्यामुळे ते तुटण्याचाही म्हणजेच फ्रॅक्चर होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे हिल्सचा वापर जास्त प्रमाणात करू नका

3. बॉडी पोश्चरवर परिणाम

हाय हिल्स घालणे हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हाय हिल्स घालण्याची सवय सोडून दिली पाहिजे. कारण हाय हिल्समुळे तुमचे वजन नीट वाढत नाही त्यामुळे तुमचे बॉडी पोश्चर बिघडू शकते.