
प्रत्येकालाच आपली स्किन नेहमीच चमकदार तसेच डागरहित दिसावी असे वाटते. परंतु बदलते वातावरण, प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि अनहेल्दी आहाराचे सेवन यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. तर त्वचेच्या समस्यांमध्ये ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सर्वात सामान्य असले तरी यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. वाढत्या पिंपल्सच्या समस्या कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे प्रोडक्ट वापरतात. परंतु याचा कोणताही विशेष परिणाम त्वचेवर दिसून येत नाही.
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी स्क्रब, मास्क आणि इतर अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण व्हाईटहेड्सच्या समस्येने काही लोकखूप त्रस्त असतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी, प्रथम ते का होते याचे कारण जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यावर कसे उपाय करावे हे आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया.
दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. संदीप अरोरा सांगतात की, जेव्हा त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल म्हणजेच सेबम आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होतात, तेव्हा छिद्रे उघडतात आणि हवेच्या संपर्कात येताच ते ऑक्सिडायझ होतात. जर ते काळे झाले तर त्यांना ब्लॅकहेड्स म्हणतात. दुसरीकडे, जर छिद्रांमध्ये घाण आणि तेल साचले आणि बाहेर येऊ शकले नाही तर त्याला व्हाईटहेड्स म्हणतात. ही समस्या चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, त्वचा स्वच्छ न करणे, हार्मोनल बदल किंवा तेलकट त्वचेमुळे उद्भवू शकते. व्हाईटहेड्स बहुतेकदा नाक, हनुवटी आणि कपाळावर दिसतात ज्याला टी-झोन म्हणतात.
काही लोक व्हाईटहेड्स दाबून काढतात. परंतु असे करू नये कारण त्यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते किंवा यामुळे त्वचेवर चट्टे येऊ शकतात.
व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा स्क्रब करणे सर्वात महत्वाचे आहे. जेणेकरून त्वचेवरील घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकता येतील.
यासोबतच योग्य आहार घ्या. तज्ञांनी सांगतात की व्हाईटहेड्सच्या उपचारांसाठी केमिकल पील्स, रेटिनॉइड क्रीम किंवा प्रोफेशनल क्लिंजिंगची शिफारस केली जाते.
व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
हेल्थलाइनच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा. तेलमुक्त आणि नॉन-कॉमेडोजेनिक प्रोडक्ट वापरा,
खूप जुने मेकअप प्रोडक्ट वापरू नका. स्पंज आणि ब्रश वापरल्यानंतर तुमचा लगेच स्वच्छ करा.
मेकअप आणि अॅप्लिकेटर कोणासोबतही शेअर करू नका.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)