Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?

जर सापाने चावा घेतला, दंश केला तर घाबरू नका. अगोदर काय करावे हे तुम्हाला अथवा घरच्या लोकांना माहिती असायला हव. कारण सापाशी सामना कधीही होऊ शकतो. तेव्हा या रामबाण उपायांनी तुम्ही एखाद्याचे प्राण नक्की वाचवू शकता.

Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
साप चावल्यावर काय कराल
| Updated on: Sep 19, 2025 | 3:35 PM

विषारी सापाचा दंश ही एक गंभीर बाब आहे. ही आपत्कालीन स्थिती मानल्या जाते. जर या काळात केवळ घाबरला तर हाती काहीच लागत नाही. हातचा माणूस निघून जाऊ शकतो. तेव्हा घाबरून न जाता योग्य उपाय करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ग्रामीण आणि शहरी भागातही साप चावण्याच्या घटना घडतात. पण सर्वच साप हे काही विषारी नसतात. काही विषारी असतात. सापाने जर अचानक हल्ला केला तर तात्काळ हे उपाय करणं फायद्याचं आहे.

साप दिसल्यावर अगोदर काय कराल?

जर शेतात, घरामध्ये वा मैदानात साप अचानक दिसला तर काय कराल? घाबरू नका. जितके शांत राहाल तितके चांगले. साप अचानक समोर आला तर त्याच्या जवळून पळून जाण्याचा प्रयत्न तर मूर्खपणा ठरेल. हळू हळू त्या ठिकाणाहून दूर होणे हे चांगले आहे. सापाला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. नाहक त्याला अंगावर घेण्याचे काम करू नका. कारण एखादा चपळ साप भीतीपोटी तुमच्यावरही हल्ला करू शकतो. साप लागलीच मनुष्यावर हल्ला करत नाही.

सापाने चावले तर कसे ओळखाल?

तज्ज्ञांच्या मते, साप चावल्यावर त्या ठिकाणी, त्या अंगावर दोन छिद्रासारखी चिन्ह दिसतात. याशिवाय अत्यंत वेदना होतात. तो भाग सुजतो. लाल होतो आणि तिथे आग होते. जर साप जास्त विषारी असेल तर मग ही लक्षण अधिक दिसू शकतात.
जसे की

  • अस्पष्ट दिसणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • घशाला कोरड, गिळण्यास त्रास
  • तोंडाला वेगळाच स्वाद येणे
  • उलटी होणे वा चक्कर येणे

ही लक्षणं दिसायला काही तास पण लागू शकतात. अशावेळी सर्वात अगोदर डॉक्टराकडे धाव घ्या. भोंदूबाबाकडे अजिबात जाऊ नका. स्वतः एकदा उपचार करण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. त्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

लागलीच काय कराल?

  1. तज्ज्ञाच्या मते, साप चावल्यावर जास्त चाल करणे, धावणे टाळा. जितके शांत राहता येईल. तितके राहा. सुरक्षित ठिकाणी थांबा. तुम्ही बैचेन होऊन धावपळ केली तर विष संपूर्ण शरिरात लवकर पोहचेल.
  2. सर्वात अगोदर अंगठी, घड्याळ अथवा एकदम फिट कपडे घातले असतील तर ते सैल करा. जिथे साप चावला तो भाग साबणाने अगोदर धुवून घ्या
  3. त्यानंतर ज्या ठिकाणी साप चावला. त्या भागच्या वरील बाजूने खालून घट्ट पट्टी बांधा. त्यामुळे विष पसरणार नाही. पट्टी, रुमाल बांधताना तो एकदम घट्टही बांधू नका आणि एकदम सैलही बांधू नका.
  4. तात्काळ चांगल्या रुग्णालयात. तज्ज्ञ डॉक्टरकडे रुग्णाला न्या. वाहनाची व्यवस्था असणे कधीही चांगले. रुग्णाला मोठ्या श्वास घ्यायला सांगू नका. जितके शांत राहता येईल. तितके चांगले.

काय करु नये?

  • जिथे सापने दंश केला. तिथले रक्त तोंडाने शोषून थुंकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका
  • घरगुती उपाय करू नका. दारू पाजणे अथवा इतर कोणतेही जालीम उपाय करू नका
  • साप चावल्यावर सैरभैर धावू नका, त्यामुळे विष गतीने सर्वत्र पसरेल