पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी काही रामबाण उपाय, पण दररोज फॉलो कराव्या लागतील ‘या’ टिप्स

आजच्या दिवसांत अनेकांना भेडसावणारी एक समस्या म्हणजे वाढणारं वजन... 8 - 9 तासांच्या नोकरीमध्ये अनेकांचं एकाच जागी बसून काम असतं. अशात शारीरिक हलचान नसल्यामुळे अनेक समस्या डोकं वर काढतात, तर तुमच्या देखील पोटाची चरबी वाढली असेल आणि ती कमी करायची असल्यास काही टीप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील... तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या टिप्स...

पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी काही रामबाण उपाय, पण दररोज फॉलो कराव्या लागतील या टिप्स
| Updated on: Oct 04, 2026 | 9:38 AM

आजची झपाट्याने बदलती लाईफस्टाईल, खाण्याच्या समवी, व्यायामाचा आाभाव… या सर्व गोष्टींमुळे पोटाच्या भागात चरबी जमा होणं ही अनेक लोकांसाठी एक मोठी समस्या आहे. एवंढच नाही तर, कामाच्या ताणामुळे अनेकांची झोप देखील पूर्ण होत नाही. हे देखील वजन वाढीसाठी मुख्य कारण आहे. रात्री 7 – 8 तास नियमित झोप घेतल्याने आणि तणावावर नियंत्रण ठेवल्याने कॉर्टिसोल हार्मोनचा स्राव कमी होऊ शकतो आणि पोटावरील चरबी टाळता येते. आपल्या रोजच्या आहारात अंडी आणि डाळींसारख्या उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने भूक नियंत्रित राहते आणि कॅलरी जलद गतीने जळतात. तर जाणून घ्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज न चुकता काय केलं पाहिजे.

जेव्हा तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा शरीरात स्रवणाऱ्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. विशेषतः, नियमित झोपेची कमतरता आणि अतिरिक्त तणावामुळे शरीरातील ‘कॉर्टिसोल’ हार्मोन वाढतो, ज्यामुळे पोटाच्या भागात चरबी जमा होण्यास चालना मिळते. त्यामुळे, पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दररोज 7 ते 8 तास गाढ झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे.

Loading...

आपल्या रोजच्या आहारात अधिक प्रथिने समाविष्ट केल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते. प्रथिनयुक्त पदार्थ पचायला जास्त वेळ लागत असल्यामुळे, वारंवार आणि अनावश्यक खाणं टाळण्यास मदत होते. आपल्या आहारात मासे, अंडी, कडधान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश केल्याने कॅलरी जलद गतीने खर्च होऊ शकतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध साखर आणि गोड पेये पोटावरील चरबी वाढण्यास प्रमुख कारणीभूत ठरतात. यांमधील अतिरिक्त फ्रुक्टोजचं यकृतामध्ये चरबीत रूपांतर होतं आणि ती पोटाच्या भागात जमा होते. त्यामुळे, शीतपेये, पॅकेटमधील रस आणि अति गोड पदार्थ पूर्णपणे टाळणे उत्तम आहे.

सर्वात महत्त्वाची टीप्स म्हणजे, भाज्या, फळे, ओट्स आणि संपूर्ण धान्यांमध्ये आढळणारे विद्राव्य फायबर आतड्यांचं आरोग्य सुधारतं. ते पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवतं आणि पोटात अनावश्यक चरबी साठण्यास प्रतिबंध करते.

दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने अति खाणे टळते आणि शरीरातील विषारी पदार्थ व चरबी बाहेर टाकण्यास मदत होते. कायम लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट म्हणजे, नियमित व्यायामाशिवाय पोटावरील चरबी कमी करणे अवघड आहे. दररोज 30 मिनिटे जलद चालणे, कार्डिओ व्यायाम किंवा योगा केल्याने पोटावरील चरबी प्रभावीपणे जाळता येतं. जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us