सॉफ्ट ड्रिंक पिण्याच्या सवयीमुळे तुमची मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत का ? जाणून घ्या कनेक्शन

| Updated on: Oct 17, 2022 | 4:39 PM

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जी मुलं कमी वयापासूनच सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे (शीतपेय) सेवन करतात, त्यांच्यामध्ये आक्रमकपणा जास्त दिसून येतो.

सॉफ्ट ड्रिंक पिण्याच्या सवयीमुळे तुमची मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत का ? जाणून घ्या कनेक्शन
सॉफ्ट ड्रिंक पिण्याच्या सवयीमुळे तुमची मुलं ॲग्रेसिव्ह होत आहेत का ? जाणून घ्या कनेक्शन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

Soft Drinks And Aggression Link: सॉफ्ट ड्रिंक, सोडा यांच्या सेवनामुळे लहान मुलं आणि टीनएजर्स यांच्या आरोग्यावर प्रभाव (side effects) पडत आहे. वजन वाढणे, दात किडणे, एवढंच नव्हे तर नीट झोप न लागणे या समस्यांमागचे कारणही सॉफ्ट ड्रिंक्स (soft drinks) आहेत, असे मानले जात आहे. काही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की सोडा अथवा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करणाऱ्या मुलांमध्ये वागणूक आणि मानसिक (mental health) समस्या सुरू होऊ शकतात.

व्हेरी वेल माइंडनुसार, शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करण्याची सवय वाढली आहे, ट्रेंड बनला आहे. याबद्दल पालक आणि मुलांमध्येही जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. याचे सेवन केल्याने मुलांना कमी वयातच लठ्ठपणा, दातांच्या समस्या, डोकेदुखी, वागणुकीतील बदल, मानसिक समस्या इत्यादींचा सामना करावा लागू शकतो.

हे सुद्धा वाचा

सॉफ्ट ड्रिंक्स का ठरतात समस्येसाठी कारणीभूत?

सॉफ्ट ड्रिंक्समध्ये सोडियम बेन्झोएट बेन्‍जोएट(sodium benzoate) आढळून येते, जे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्याशिवाय, त्यामध्ये भरपूर कॅफेन असते. तसेच सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेली अति साखरेचा मुलांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.

वाढत्या वयात सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने होणारे नुकसान

वागणुकीतील बदलाची समस्या

अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की जी मुले लहानपणापासूनच सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करतात ती मुलं ॲग्रेसिव्ह होण्याचा धोका असतो. त्यांच्यामध्ये बिहेवियरल (वागणुकीतल बदल) आणि मानसिक समस्या दिसू शकते. त्याशिवाय डिप्रेशन, राग येणे आणि आत्महत्येची प्रवृत्तीही जास्त असते.

लहान वयातच लठ्ठपणाचा त्रास

सोड्यामध्ये नगण्य कॅलरीज आणि भरपूर प्रमाणात साखर असते, ज्यामुळे लहानपणातच लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे , त्यामुळे टाईप-2 मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.

भूक न लागणे

सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्यामुळे मुलांची भूक कमी होते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते.

गोड सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स हे दात किडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यांचे सेवन केल्याने दातांच्या एनॅमलचे नुकसान होते आणि दात किडतात.

झोपेवरही होतो परिणाम

सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात कॅफेन आढळते, ज्यामुळे मुलांमध्ये झोपेची समस्या वाढते. त्याच्या सेवनामुळे मुलांमध्ये चिंतेची लक्षणे देखील दिसू शकतात.